संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे पोलिसांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या गुन्हेगाराची परिसरात धिंड काढण्यात आली. चंदन नगर भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला चंदननगर पोलिसांनी अटक केली.

त्यानंतर त्याची चंदननगर परिसरात धिंड काढण्यात आली.

सपाटे आणि त्याच्या साथीदारांनी खराडी परिसरात महिन्याभरापुर्वी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, धीरज सपाटे हा गेल्या महिन्याभरापासून फरार होता. त्याला चंदननगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याची परिसरातून धिंड काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!