मुंबई: प्रतिनिधी

मुंबई,साकीनाका पोलिस स्टेशन च्या हद्दीत लाल काळा अवैध्य रित्या ऑनलाइन जुगाराची खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांची  फसवणूक सकाळी ७ ते १२ह्या वेळेत केली जात असून,येणाऱ्या नागरिकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्याला जबरदस्ती ने खेळण्यास पवृत्त करतात व त्याला पहले पैसे जिंकून देतात आणि नंतर त्याची ऑनलाइन फसवणूक करतात. हे सर्व प्रकार सकाळी ७ते १२. या वेळात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच

१)साकीनाका मेट्रो ब्रीज खाली,

२)इंडीयन ऑईल पेट्रोल पंप शेजारी बस स्टॉप लगत.

३)पवई साकीनाका टेंपो स्टँड लगत.

४)प्रभाकर फोटो फ्रेम मेकर लगत

ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून हा व्यवसाय सुरू आहे. ह्या लाल काळा अवैध्य जुगार चालणारे इसम नामे

१) रफिक शेख

२) शमशुद्दिन सय्यद जो की नाला सोपराचा रहिवाशी आहे.

३)बाबा शेख(कुर्ला).

४) येथील रहिवाशी, असून मनी ट्रान्स्फर चे ऑनलाइन फसवणूक करतात व ह्या सर्वांची एक मोठी टोळी असून, जे येणाऱ्या नागरिकांना ५०० रूपये मध्ये मोबाईलचा अमिष दाखवून जबरदस्तीने खेळण्यास भाग पाडतात. ह्या अवैद्य रित्या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या विरुद्ध ह्याच्या आधी देखील  DCP सर, ACP सर,साकीनाका पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी ह्यांना ह्या अगोदर ही तक्रारी अर्ज करून सुद्धा हा व्यवसाय  पुन्हा अगदी जोमाने सुरू आहे. हा व्यवसाय चालवणारे शमशुद्दीन सय्यद , रफिक शेख ,बाबा शेख(कुर्ला) ह्यांना पोलिस प्रशासनाची भीती नाही का? वारंवार तक्रार करून सुद्धा हा व्यवसाय बंद का होत नाही? अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे. ह्या वरती वरिष्ठ अधिकारी कारवाही करतील का? हा व्यवसाय कायम स्वरुपी बंद करून ह्या इसमा वरती कारवाही करतील का? ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम तर वरिष्ठ अधिकारी करत नाही ना? का वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन तर झाले नाही ना? त्यामुळे ह्यांच्या वरती कारवाही होत नाही अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे. लवकरच नेशन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ह्या सर्व प्रकरणाचा खुलासा होईल कारण नेशन् लाईव्ह चे संपादक शहणावज मुलाणी साहेबांनी देखील ह्या पूर्वी वारंवार DCP, ACP , साकीनाका पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी ह्यांना तक्रारी अर्ज व काही व्हिडिओ पुरावे देखील सादर करून सुद्धा हा व्यवसाय तात्पुरता बंद करून.पुन्हा सुरू आहे. तरी स्थानिक नागरिकांनी नेशन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून मुंबई पोलिस आयुक्त ह्यांना विनंती केली आहे की आपण साकीनाका पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी ह्याची सखोल चौकशी करून असे व्यवसाय चालवणार्‍या इसमा वरती त्वरित कारवाई करून सदर व्यवसाय कायमचा बंद करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!