प्रतिनिधी: संतोष यादव

 

पुणे – हॉटेल चालकाला पैसे मागण्याच्या कारणावरून येरवड्यात सराईतांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी

मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याघटनेत विकी राजू चंडालिया याच्यावर गोळीबार करण्यात आला असून सराईत आरोपी आकाश सतीश चंडलिया याने त्याच्या इतर सहा साथीदारासोबत हा गुन्हा केला. याप्रकरणी आरोपी अक्षय सतीश चंडालिया (वय 24),अमन सतीश चंडालिया (वय 27),अभिषेक श्याम चंडालिया (वय 23,संदेश संतोष जाधव (वय 18, सर्व जण रा. गुरुद्वारा जवळ स.नं.14 जय जवान नगर येरवडा), सुशांत प्रकाश कांबळे (वय 29, रा.पर्णकुटी हाउसिंग सोसायटी येरवडा)या पाच आरोपीनां अटक करण्यात आली असून 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.जखमी विकी याच्या पोटात गोळी लागली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून मुख्य आरोपी आकाश हा देखील जखमीआहे,त्याच्यावर देखील उपचार सुरु आहेत. पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा अग्रेसन हायस्कूल समोर विकी चंडालिया हा भाड्याने हॉटेल चालवत होता. त्याच्या परिचयातील आकाश चंडालिया हा काही दिवसापासून त्याच्याकडे पैशांची मागणी करीत होता.गुरुवारी मध्यरात्री दिड वाजता आकाश त्याच्या साथीदारा सोबत आला. पुन्हा पैशांची मागणी करू लागला. त्याला विकीने पैसे देण्यासाठी नकार दिला. यावेळी झालेल्या वादातून आकाश याने गावठी कट्ट्यातून दोन गोळया झाडल्या. एक गोळी विकीच्या पोटात लागली.यावेळी झालेल्या हाणामारीत आकाश देखील किरकोळ जखमी झाला.गोळीबार करून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी गुन्ह्यातील सहा आरोपीनां ताब्यात घेऊन अटक केली.याहल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामधील मुख्य आरोपी आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लोणावळा येथे खूनाचा गुन्हा दाखल आहे.यामध्ये त्याला आठ वर्ष शिक्षा झाली होती. काही दिवसापूर्वीच तो सुटून आला आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारावर देखील गुन्हे दाखल आहेत.या घटनेमुळे येरवडा आणि परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.सदर ठिकाणी रात्रभर हॉटेल सुरु ठेऊन अवैध वस्तूंची विक्री केली जात होती. सदरच्या अनधिकृत हॉटेलवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.या परिसरातील रात्री उशिरापर्यंत अनधिकृत हॉटेल, पानटपरी व इतर अनधिकृत व्यवसाय सुरु असतात. तसेच अनेक अवैध धंदे देखील राजरोसपणे सुरु आहेत. याकडे देखील पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.त्यातूनच गोळीबारासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. शहरात गोळीबाराची हि सलग चौथी घटना असून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढील काळात अशा उशीरापर्यंत चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!