संपादक: शाहनवाज मुलानी

 

पुणे : पुण्यात शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील वाद सोडविणे एकाला चांगलच महागात पडलं आहे. शहरातील विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात भांडण सोडविणाऱ्या एकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रशांत नारायण शिंदे (वय-४५, रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अभय शेलार (वय-३३, रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी) याच्यासह चौघांना अटक केली आहे. याबाबत विनोद नारायण शिंदे (वय-४३) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय शेलार आणि प्रशांत शिंदे हे शेजारी राहण्यास आहेत. शुक्रवारी रात्री अभयच्या आई-वडीलांचा वाद सुरू होता. त्यावेळी त्याची आई प्रशांतच्या घरी आली. माझा नवरा वाद घालत आहे. त्याला समजावून सांगा, असं तिने प्रशांतला सांगितले. त्यानंतर प्रशांत अभयच्या घरी गेला. प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगितले. प्रशांतने मद्यपान केले होते.

मद्याच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर अभयच्या वडिलांनी या प्रकारची माहिती अभयला दिली. त्यानंतर अभय त्याचे मित्र निखिल, अभिजीत, सुमित यांना घेऊन घरी आला. त्या चौघांनी प्रशांतला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!