प्रतिनिधी :संतोष यादव

 

पुणे :पुण्यातल्या हिट ऍण्ड रन प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार वर मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सिल केला आहे. या कारवाईनंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घडलेला अपघात दुर्दैवी आहे, नशेमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून हा अपघात घडला आहे. ज्या पबमध्ये हा मुलगा मद्यप्राशन करत होता, त्याच्यावर कारवाई केली आहे. दोन्ही पबचं लायसन्स सस्पेंड करायचे आदेश काढण्यात आले आहेत’, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे. तसंच उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बार तपासण्याची कडक मोहिम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चालवण्यात येणार आहे.

 

पब मालक कोर्टात हजर

दरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक या पब मालक आणि मॅनेजरना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी कोर्टात आणलं गेलं आहे. मुलगा अल्पवयीन असतानाही त्यांना पबमध्ये प्रवेश दिला, दारू सर्व्ह केली, हा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे, तसंच त्यांनी मालक आणि मॅनेजरची पोलीस कोठडीही मागितली आहे.

ब्लॅक पबमध्ये फक्त मेंबर्सना प्रवेश असतो मग तरीही प्रवेश कसा? या सर्व बाबींची पोलिसांना चौकशी करायची आहे. पबमध्ये सीसीटीव्ही फुटेज का नाही? ब्लॅक पब नेमकं काय लपवू पाहत आहे’, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे.

‘तरुण आणि त्याचे मित्र अल्पवयीन असतानाही त्याला हॉटेल कोझीमध्ये प्रवेश कसा दिला? कोझी आणि ब्लॅक पबने त्यांना मद्य कसं दिलं? ब्लॅक पबमध्ये फक्त मेंबर्सना प्रवेश दिला जातो, मग अल्पवयीन मुलाला प्रवेश कसा दिला? ब्लॅकचे आणखी व्यवस्थापक फरार आहेत,’ असं म्हणत सरकारी वकिलांनी कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!