संपादक : शहाणवाज मुलाणी

 

पुणे :कल्याणी नगर हिट अॅण्ड रण प्रकरणानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून उत्पादन शुल्क विभागाने मागील तीन दिवसांत पुणे शहर परिसरातील 32 पबवर कारवाई करून ते सील पेले आहेत. 14 पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, विहीत वेळेनंतर बार सुरू ठेवणे, अवैध मद्यसाठा ठेवणे या पब मालकांना भोवले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन तरुणाच्या भरधाव कारने दोघांचा जीव घेतला. मुंढव्यातील एका पबमध्ये त्याने मित्रांसह पार्टी केली. तरुण अल्पवयीन असतानाही त्याला दारू पुरविल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पबच्या मालक, व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील पबमध्ये सुरू असलेले गैरप्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा जागी झाली असून अशाप्रकारे अल्पवयीन तरूणांना दारू पुरविणे, नियमाबाह्य पद्धतीने पब सुरू ठेवणाऱयावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील 14 पथके तयार केली असून या माध्यमातून पुणे, पिंपरी चिंचवडसह परिसरात छापेमारी करण्यात येत आहे.

वर्षभरात 297 गुन्हे

2023 -24 या वर्षभराच्या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून एकूण 297 परवान्यांवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 कोटी 12 लाख इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच 17 परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली असून 2 परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

पब, बारची वेळोवेळी तपासणी करून कारवाई करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. एप्रिल 2024 पासून आजतागायत 54 अनुज्ञप्त्यांवर गुन्हे नोंद केले आहेत. तर, काही आस्थापना सील केलेल्या आहेत.
– चरणसिंह रजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे

– मागील तीन दिवसांत 32 परवाना कक्ष अनुज्ञप्तींवर विविध कारणांसाठी विभागीय गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये 10 रुफटॉप, अंदाजे 16 पब व इतर 6 बारचा समावेश आहे. याबाबतचा अहवाल उत्पादन शुल्ककडून जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. श्री सुहास दिवसे यांनी सर्व 32 अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्री अजित पवार गायब

कल्याणीनगरमधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत? ते गेले कुठे? असा प्रश्न पुणेकर नागरिकांना पडला आहे. सकाळी लवकर उठून मी कामाला लागतो, असे अजित पवार अनेकदा जाहीरपणे सांगत असतात. पण भयंकर अपघाताच्या घटनेला पाच दिवस झाले तरी पालकमंत्री पुण्यात दिसले नाहीत. दरम्यान, विरोधकांनीही याबाबत अजित पवारांवर टीकास्त्र्ा सोडले आहे.

बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणीला चिरडले. या घटनेनंतर अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याचे तीव्र पडसाद राज्यासह देशभरात उमटले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालयात आले आणि अपघाताचा आढावा घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, पालकमंत्री असतानाही अजित पवार गायब आहेत.

पालकमंत्र्यांनी दखल घेणे गरजेचे होते

पालकमंत्री अजित पवार हे कोणतीही घटना घडल्यानंतर शासकीय यंत्रणेच्या सातत्याने संपका&त असतात. त्यांना सूचना देऊन मदत करीत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. मात्र, रविवारी (दि. 19) पहाटेच्या सुमारास एवढा गंभीर अपघात होऊनही पवार पुण्यात अजूनही फिरकले नसल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, अपघाताच्या दिवशी कोणत्या राजकीय नेत्याने पोलिसांना पह्न केला होता? तिथे वकील कोणी पाठवला आणि इतक्या पटकन आरोपीला जामीन कसा मिळाला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांबाबतचा प्रश्न फडणवीसांना विचारायला हवा होता – सुप्रिया सुळे

अपघातानंतर पालकमंत्री पुण्यात आलेले नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आज विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पुण्याच्या पालकमंत्र्यांची माझी देखील गेल्या कित्येक दिवसांपासून भेट नाही. कारण जिह्यात अपघातासह दुष्काळ, इंदापुरातील घटना, अतिवृष्टी, असे अनेक प्रश्न आहेत. गृहमंत्री फडणवीस पुण्यात आले होते तेव्हा पालकमंत्र्यांबाबतचा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!