मुख्य संपादक : शहाणवाज मुलाणी

 

पुणे :भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली होती. या घटनेत अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पोर्शे कारचा जेव्हा अपघात घडला तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

पुणे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोर्शे अपघात प्रकरणात मागच्या सीट वर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी अपघात घडवणाऱ्या अल्पवयीन आरोपीने दारू पिऊन गाडी वेगाने चालवत अपघात केला असल्याचं त्यांच्या जबाबात सांगितलं आहे. आता या मुलांना पोलीस या खटल्यात साक्षीदार करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान दुसरीकडे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीची चौकशी करायची आहे. त्यांनी त्या संदर्भात बाल न्याय मंडळाला पत्र देखील पाठवले आहे. मात्र सध्या या मुलाचे वडील आणि आजोबा कस्टडीमध्ये आहेत, तर आई फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बाल न्याय मंडळानं चौकशीची परवानगी दिल्यास अल्पवयीन आरोपीची चौकशी ही त्याचे वकील किंवा दुसऱ्या नातेवाईकांसमोर होऊ शकते.

काय आहे प्रकरण?

पुण्यामध्ये एका भरधार पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना कल्याणीनगर परिसरात घडली होती. या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानं पुणेकरांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान त्यानंतर आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल हे कोठडीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!