प्रतिनिधी: संकेश यादव

दिनांक १५/०७/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केली म्हणून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५६१/२०२३ भादंवि कलम ४५४ ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

नमुद गुन्हयातील फिर्यादीची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व चोरीस गेलेली मालमत्तेमुळे त्यांना बसलेला प्रचंड मानसिक धक्का पाहुन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईंगडे यांनी तात्काळ तपासी पथक अधिकारी सपोनि गोडसे, सपोनि जाधव यांचे नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुचना दिल्या. त्यानुसार सदर गुन्हयाच्या तपासाचे अनुषंगाने दोन्ही पथके शिक्रापुर व दौड भागात रवाना झाले. परंतु आत्यंतिक परिश्रम करुनही काहीही हाती आले नाही. त्यानंतर मागील काळात जेलमधुन सुटलेल्या आरोपीं विषयी माहीती घेण्याचे काम सुरु करण्यात आले. सदरची माहीती घेत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांनी जेल रिलीज झालेल्या आरोपींची माहीती घेतली परंतु त्या काळात कोणी लोणीकंद परीसरात आल्याची खात्रीशिर माहीती मिळाली नाही. तरीही खचुन न जाता दोन्ही पथकाने आपले काम चालूच ठेवले.

 

त्यानंतर सपोनि श्री रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार सकाटे, पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांना माहीती मिळाली की, पिंपरी परिसरातील एक दिवसा घरफोडया करणारा आरोपी नुकताच सुटला आहे. त्यानुसार त्याच्या हालचाली विषयी गोपनीय खबऱ्याकडून माहीती घेतली असता तो लोणीकंद परीसरात येवुन गेल्याचे समजले. त्यावरुन सदर आरोपीचा ठाव ठिकाणाची माहीती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याचे घरी राहत नव्हता व त्याचा नक्की असा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे जिकरीचे झाले होते. परंतु त्याचे जुने राहण्याचे अड्डे व त्याचेवर नाराज असलेले दुश्मन यांचेकडे त्याचेविषयी माहीती मिळवून त्याला शिताफीने नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. सुरवातीला त्याने सदरचे गुन्हयाविषयी काहीही माहीती दिली नव्हती परंतु पोलीस भाषेत त्याला विचारणा केल्यावर त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली व साथीदारांची नावे सांगीतली व सदर गुन्हयातील सोने त्याने कशा पध्दतीने खपविले या विषयी माहीती दिली. त्यानुसार सपोनि श्री. गोडसे व त्यांचे पथकाने पुढिल तपास करीत आणखी एका आरोपीस अटक केले असुन चोरीस गेलेल्या संपूर्ण सोन्याची लगड तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींची तब्बल ०८ दिवस पोलीस कस्टडी घेण्यात •आली असुन गुन्हयात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांची आरोपीकडुन १३ तोळे सोन्याची लगड असा एकुण ७ लाख रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असुन लवकरच मा न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी यांना नमुद

 

मालमत्ता देण्यात येणार आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास सपोनि गोडसे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा. श्री. शशीकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४ पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील सौ. सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली श्री. विश्वजीत काइंगडे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक विनायक साळवे, सागर जगताप, पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, आशिष लोहार, गणेश डोंगरे, महिला पोलीस शिपाई प्रतिक्षा पानसरे लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!