मुख्य संपादक :शहाणवाज मुलाणी

 

पुणे : कल्याणीनगर “हिट अँड रन” अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघानां अटक केली आहे. आमदार सुनील टिंगरे यांचा निकटवर्तीय अश्पाक मकानदार याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर आरोपीच्या वैद्यकीय

तपासणीदरम्यान ससून रुग्णालयात हे दोन्ही आरोपी उपस्थित होते. या दोघांना मुंबईमधून अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली. न्यायालयाने आरोपींना १० जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अश्पाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाष नगर, नवी खडकी, येरवडा) यांना अटक नावे आहे. कल्याणीनगरमध्ये रविवार, १९ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोन आयटी अभियंत्या तरुण- तरुणीचा दुर्देवी भीषण मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कार चालक १७ वर्षीय अल्पवयीन मुख्य आरोपी मुलावर भादवि ३०४, ३०४ (अ), २७९, ३३८, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, १९९/१७७ अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामधील पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर भादवि २०१,

१२० ब, २१३, २१४, ४६७ या नुसार कलमवाढ करण्यात आली. तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडील विशाल अगरवाल, ससूनचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे तसेच आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली होती. आरोपी अल्पवयीन मुलाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्याच्या रक्ताऐवजी आई शिवानी हिचे नमुने घेण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. तपास सुरू असताना आरोपी मकानदार आणि गायकवाड या दोघांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचला असल्याचे समजले. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत मकानदार आणि गायकवाड या दोघांची नावे समोर आली होती. तसेच ससूनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हे दोघे दिसून आलेले होते. मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचा वडील विशाल अगरवाल याने मकानदार आणि गायकवाड यांची मदत पुरावा नष्ट करण्यासाठी घेतली. त्यांच्या मदतीने ससून रुग्णालयामधील डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला. त्याच्या मध्यस्थीने डॉ. श्रीहरी हाळनोर, कर्मचारी अतुल घटकांबळे या दोघांशी आर्थिक देवाणघेवाण

केली. त्यांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल करण्यात आला. त्याऐवजी त्याची आई शिवानी अगरवाल हिचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मकानदार आणि गायकवाड यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांचा शोध सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण तसेच व खबऱ्यामार्फत शोध सुरू होता. या दोघांना अखेरीस मुबंईतून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!