प्रतिनिधी,

श्री गोविंदराम रत्नलाल माळी, वय ३८ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. ग्रीन इस्टेट सोसायटी प्लॅट नं. ६०६, बिल्डींग सी. चाकण ता. खेड जि. पुणे यांनी फिर्यादी दिली की, दिनांक २२/०७/२०२३ रोजी रात्रौ २१/०० ते दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १०/०० वाजताचे दरम्यान मौजे करुळी गावचे हद्दीत ता. खेड जि. पुणे बरगेवस्ती, हॉटेल महिंद्रा गार्डनचे शेजारी, पुणे नाशिक हायवे लगत असलेल्या एम आर सुर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडीया प्रा. लि. या गोडाऊन मध्ये वा ते सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान अज्ञात चोरटयाने शटर उचकटुन त्यामधुन आत प्रवेश करुन २५,१७,०८७/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे व आकाराचे एलईडी टिव्ही चोरून नेले म्हणुन फिर्याद दिल्याने महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२७ / २०२३ भा.द.वि.क. ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हा हा चोरीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असुन सदरवाबत मा. पोलीस आयुक्त सेवा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना सीसीटीव्ही पाहुन व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.

 

दाखल गुन्हयाचे तपासामध्ये तपास पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळावरील सी सी टि व्ही फुटेज तपासले असता सदर ठिकाणी गोडाऊन समोर गाडीचे रेडीयम चमकत असल्याचे दिसल्याने त्यावरून घटनास्थळ ते सुपे टोलनाका अहमदनगर पर्यंत एकूण ४५ सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी करुन गाडीचा शोध घेत सुपे टोलनाका सी सी टि व्ही कॅमे-यामध्ये टाटा कंपनीची ११०९ टेम्पो नंबर एम एच २० डीई ३८९० असा असल्याचे निष्पन्न झाले.

 

दाखल गुन्हयामध्ये चोरी करताना वापरण्यात आलेल्या टाटा कंपनीची ११०९ टेम्पो नंबर एम एच २० डीई ३८९० निष्पन्न झाल्याने पुढील तपास करताना असे निष्पन्न झाले की सुर्या इलेट्रॉनिक्स इंडीया प्रा. लि. कंपनी मौज कुरुळी, ता. खेड जि. पुणे येथील चोरी हि १) आजीज पाशा शेख, वय ६० वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. टाकळी ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजी नगर २) कबीर बुढन पठाण, वय- ३४ वर्ष, रा. मुळपत्ता – आष्टी. ता. परतुन जि. जालना सध्याचा पत्ता भारतनगर, वाळुंज, ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांनी केली आहे. त्यानुसार कबीर बुढन पठाण, वय ३४ वर्ष, रा. मुळपत्ता आष्टी, ता. परतुन जि. जालना सध्याचा पत्ता : भारतनगर, वाळुंज, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन चोरीस गेलेला माल १९,९०,४९८/- रुपये किंमतीचा हायर व कोडॅक कंपनीचे वेगवेगळे आकाराचे ६१ टिव्ही व ६ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

 

अ.क्र. पोलीस ठाणे

 

०१

 

महाळुंगे

 

गु.र.नं. व कलम एकुण जप्त माल

 

१) हायर व कोडॅक कंपनीचे वेगवेगळया भा.द.वि.क. आकाराचे ६१ टिव्ही

 

१९,९०,४९८/-

 

२) टाटा कंपनीचा क्र. एम एच २० डी ई ३८९००६,००,०००/-

 

४२७/२०२३

 

४६१, ३८०, ३४

 

किंमत

 

२५,९०, ४९८/- एकुण माल जप्त

 

अटक आरोपीची नावे :

 

१) पीर बुढन पठाण, वय- ३४ वर्ष, रा. मुळपत्ता आष्टी, ता. परतुन जि. जालना सध्याचा पत्ता

 

भारतनगर, वाळुंज, ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांना दाखल गुन्हयामध्ये दिनांक २८/०४/२०२३ रोजी वाजता अटक करण्यात आली आहे.

 

अ.नं.

 

 

 

पोलीस ठाणे

 

अटक आरोपींवर दाखल गुन्हयाची माहिती

 

आळंदी

 

आळंदी आळंदी

 

३ ४

 

५.

 

वाळुंज (छत्रपती संभाजीनगर)

 

६ अंबड (जालना)

 

वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) ६४ / २०१६ भादवि कलम ४५४४५७,३८०

 

गु.र.नंबर व कलम

 

२५९/२०१७ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४

 

१७४/२०१८ भादवि कलम ४५७, ३८०, ४११,३४

 

२४०/२०१८ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४

 

| २३१/२०१५ भादवि कलम ३९९ ४०२

 

०९ / २०२१ भादवि कलम ४६१,३८०

 

यातील पाहिजे आरोपीचे नाव :-

 

१ ) आजीज पाशा शेख, वय ६० वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. टाकळी ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजी नगर कंपनीना आवाहन

 

याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कंपनी परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड नेमावेत तसेच सी सी टि व्हि कॅमेरे व लाईट लावाव्यात तसेच कंपनी परिसरामध्ये संशयित इसम फिरताना मिळुन आल्यास

 

पोलीसांशी संपर्क साधावा त्यामुळे कंपनीमधील चोरीस प्रतिबंध निर्माण होईल. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे मा अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, मा पोलीस उप-आयुक्त श्री विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंतराव बाबर, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल बडेकर, ममोना जमदाडे पोकों/ शिवाजी लोखंड, बाळकृष्ण पाटोळे, शरद खरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे, वाळुज पोलीस स्टेशनकडील पोना/ विजय पिंपळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रदिप गायकवाड, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!