प्रतिनिधी,

दि.१७/०७/२०२३ रोजी यातील फिर्यादी यांना झोमॅटो कंपनीची विश्रांतवाडी येथील ऑर्डर मिळाल्याने सदरची ऑर्डर घेवुन विश्रांतवाडी येथे पार्सल देवुन त्याच्या मोटर सायकल वरून जात असताना विश्रांतवाडी चौकातील चव्हाण चाळ जवळ आले असता टोली प्रमुख विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे व त्याच्या साथीदारांनी मोटार सायकलवर येवुन फिर्यादी यांच्या गाडीस मोटार सायकल आडवी लावुन हातातील धारदार शस्त्राचा फिर्यादी यांना धाक दाखवून फिर्यादी यांच्या बंगत असलेल्या पाकीटातील १५००/ रु. रोख बळजबरीने काढुन घेवुन पुढे जावुन शांतीनगर भागातील दुचाकी व तीनचाकी गाड्यावर धारदार शस्त्राने मारून, तोडफोड करून, सार्वजनिक मालमतेचे नुकसान करून आरडा-ओरडा करून शांतीनगर भागात दहशत निर्माण केली म्हणुन त्याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.१९९ / २०२३ भा.द.वि. कलम. ३९५,३९७,३९२.३४१,४२७ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) मपो अधि कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे, वय २० वर्षे रा. दुर्गामाता मंदीर लेन नं. १२ गणेशनगर बोपखेल पुणे (टोळी प्रमुख) २) कुणाल ऊर्फ साहील बाबु पेरुमलटवय २१ वर्षे रा.शांतीनगर, येरवडा पुणे ३) रोहीत शैलेश सदाकळे, वय २१ वर्षे रा. सदर ४) गणेश बाबु बावधने वय २० वर्षे रा. पडाळे वस्ती आंध रोड खडकी पुणे ५) अदित्य भारती शेडगे वय २० वर्षे रा. पिपळे गुरव पुणे ६) तेजस ऊर्फ बलमा अर्जुन गायकवाड वय २० वर्षे रा. जुनी सांगवी पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे.

गुन्हयाच्या तपासा मध्ये टोळी प्रमुख विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे याने आपली नव्याने टोळी तयार केली आहे मागील ४ वर्षांपासून आपल्या गुन्हेगारी कारवाया करीत असून त्याच्यावर व त्यांच्या साथीदारावर प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशिर जमाव : जमवुन, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे आपल्या होळी सदस्यां कडुन गुन्हे घडवुन आणणे, दहशत निर्माण करणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशाचा भंग करणे तसेच विश्रांतवाडी भागात आपले टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत राहावी म्हणून ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत होते. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.

सदर टोळी प्रमुखावर एकूण ०६ गुन्हे दाखल असुन त्याने व त्याचे संघटीत टोळीतील साथीदार यांनी आपल्या गुन्हेगार टोळीचे वर्चस्व व अर्थिक फायद्यासाठी यातील आरोपी यानी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतचे बेकायदेशिरपणे अधिक फायदयाकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्याचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ ( २ ) ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करणे कामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय भापकर यांनी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. १९९/२०२३ भा.द.वि. कलम ३९५. ३९७.३९२.३४१, ४२७ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महा. पो. अधि कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२) ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांनी पूर्व मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे श्री. संजय पाटील हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे, श्री. शशिकात बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. भालचंद्र ढवळे सव्हेलन्स पथकाकडील पोलीस अमलदार मनोज शिंदे व सुनिल हसबे यांनी केलेली आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणावर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीका मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ४१ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!