प्रतिनिधी,

शासनाचे उपक्रमा अंतर्गत अंमली पदार्थ डि अॅडिक्शन व ऊमन सेपटी (महिला सुरक्षा) अनुषंगाने समाजामध्ये जनजागृती करणे करीता मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी मॅरेथॉन आयोजित करणे बाबत सुचना दिल्या होत्या, त्यानुसार मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस दलाचे वतीने पुणे पोलीस व नागरीकांकरीता ब्ल्यु ब्रिगेड रनिंग क्लब, पुणे कडून दिनांक ०६/०८/२०२३ रोजी सकाळी ०५.३० वा. “रन फॉर डि- अॅडिक्शन अॅण्ड रन फॉर ऊमन सेफ्टी” मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचा सकाळी ०९.०० वा. पुर्वी समारोप होईल.

मॅरेथॉन मधील सहभागी पोलीस व नागरीक स्पर्धक यांनी त्यांचे टी-शर्ट व बिब नंबर दिनांक ०५/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० वा. या वेळेत हॉटेल वेस्टीन ( लॉबी ), कोरेगाव पार्क, एबीसी रोड, मुंढवा, पुणे येथून प्राप्त करुन घ्यावेत.

सदरची मॅरेथॉन स्पर्धा बेस्टीन हॉटेल, एबीसी रोड, कोरेगाव पार्क, मुंढवा, पुणे येथून सुरू होऊन हडपसर मगरपट्टा सिटी येथून पुन्हा वेस्टीन हॉटेल येथे समारोप होईल, सदरचे रजिस्ट्रेशन मोफत ठेवण्यात आले होते, सहभागी स्पर्धक यांना मोफत नाष्टा, टि-शर्ट, मेडेल दिले जाणार आहे. रन फॉर डि-अॅडिक्शन अॅण्ड रन फॉर ऊमन सेफ्टी मॅरेथॉनमध्ये पोलीस व नागरिक असे ६५० ते ७०० स्पर्धेक धावणार आहेत. या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पुणे शहरातील प्रतिष्ठीत

नागरिक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सहभागी नागरिकांना सुचित करण्यात येते की, सदर मॅरेथॉन मध्ये सहभाग घेणे कामी हॉटेल वेस्टीन या ठिकाणी दि.०६/०८/२०२३ रोजी सकाळी ०५/३० वा उपस्थित रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!