प्रतिनिधी, संकेश यादव

दिनांक ०४/०८/२०२३ रोजी मुंबई पोलीस कंट्रोल रूम या ठिकाणी हरीयाणा पोलीस कंट्रोल रूम वरून माहिती देण्यात आली की. कोणीतरी अज्ञान इसमाने हरीयाणा पोलीस कंट्रोल रूमला फोन करून चमकी दिल्ली की. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार, मुंबई व दिल्ली विमानतळ येथे बॉम्ब ब्लास्ट होणार किंवा अन्य काही तरी घटना होणार आहे. अशी माहिती मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हरीयाणा पोलीस कडुन प्राप्त झाल्यावर सहार पोलीस ठाणे येथे गुरक ३२६ / २०२३ कलम ५०६ (२), ५०५ (१) (ब). भादवि अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरचा गुन्हा नोंद केल्यावर धमकीचा फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेण्यासठी सहार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक तांत्रिक कौशल्याचे आधारे माहिती प्राप्त करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पॉडीचेरी या ठिकाणी गेले. सदर ठिकाणी आरोपीचा शोध घेतला व आरोपीला पोलीस पथकाने पाँडीचेरी याठिकाणाहून ताब्यात घेतले व अटक करण्यात आलेली आहे…

अटक करण्यात आलेला इसम पुरूष वय १९ वर्षे, पाँडीचेरी गुन्हयातील अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असुन गुन्हयाचा पुढील तपास सहार पोलीस ठाणे करत आहे.

सदरची कामगिरी श्री. विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई, श्री देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, मुंबई, श्री सत्य नारायण, पोलीस सह आयुक्त (का व सु), मुंबई, श्री. परमजितसिंह दहिया, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बांद्रा, (प), मुंबई, श्री. दिक्षीत गेडाम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ८ मुंबई, श्री. श्रीराम कोरेगावकर सपोआ विमानतळ विभाग, श्री. संजय गोवीलकर, वपोनि सहार पो.ठाणे, श्री. मंगेश बोरसे पोनि (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि सुशांत बावचकर, पोशिक ०८०८६५ / शैलेश माने, पोशि सागर गायकवाड (तांत्रिक मदत) या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!