प्रतिनिधी,

फिर्यादी ह्या शिवाजीनगर कोर्ट येथे नियुक्त असताना कोर्टात दाखल असलेली केसची फाईल, आरोपी नामे अॅड. राहुल रमेश माडेकर व मयत आरोपी नामे विद्या संपतराव साळुंखे यांनी आपसात संगनमत करून फिर्यादीकडुन सदर केसची फाईल दिनांक २५/०१/२०१२ रोजी कोर्ट क्रमांक ०३ शिवाजीनगर येथून पाहणे करीता मागितली असता, ती फाईल फिर्यादी यांनी विश्वासाने नमुद आरोपींचे ताब्यात दिली असता, सदर आरोपी यांनी फिर्यादी यांना परत देतो असे सांगुन त्यांना परत दिली नाही.. म्हणुन सदर बाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे वरील दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा रजि नं.३८/२०१२ भादवि कलम ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

दाखल गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी करून ना. न्यायालया मध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. नमुद गुन्ह्यातील आरोपी विद्या संपतराव साळुंखे या दरम्यानच्या काळात मयत झाल्या. सदरकामी सरकार पक्षाने एकुण ०७ साक्षीदार तपासले.. दिनांक ०४/०८/२०२३ रोजी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. एस. आर. तोतला यांचे न्यायालयात आरोपीता विरुद्ध गुन्हा शाबीत झाला व त्यात आरोपीत अॅड. राहुल रमेश माडेकर यास ०२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे…

सदरकामी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रियंका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोर्ट पैरवी अंमलदार सपोफी मोहन भापकर, कोर्ट पोलीस अंमलदार, सोनवणे, महिला पोलीस अमलदार, बेंद्रे यांनी केसचे कामकाज पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!