प्रतिनिधी,

दि.०४.०८,२०२३ रोजी निरंकार अपार्टमेंट दुसरा मजला, एफ.सी.रोड, मॉडेल कॉलनी पुणे येथील एका ऑफीसचे दार लोखंडी पान्याचे सहाय्याने तोडुन आत प्रवेश करून ऑफीस मधील एकुण ०४ लॅपटॉप चोरी केले. बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० गुन्हा दाखल झाला होता.

या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना युनिट कडील पोलीस अमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज पाहुन सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत आरोपीचा फोटो गुप्त बातमीदारास दाखवुन अधिक तपास करीत असताना पोलीस अंगलदार दत्ता सोनवणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत इसमासारखा दिसणारा इसम हा

दारुवाला पुल चौक नाल्या लगत, सार्वजनिक शौचालया लगत, रास्ता पेठ पुणे येथे थांबलेला आहे.

वगैरे खात्रीशीर बातमी प्राप्त झालेने युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे बातमीतील नमुद ठिकाणाचे थोडे अलिकडे आड बाजुला थांबुन व्यवस्थीत पाहणी केली असता दारुवाला पुल चौक, येथील सार्वजनिक शौचालया लगत असलेले नाल्याजवळ रास्ता पेठ पुणे येथे सीसीटिव्ही फुटेज मधील वर्णनाचा एक इसम थांबलेला दिसला. लागलीच वरील नमुद पोलीस स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव पत्ता मंगेश विजय चव्हाण वय २६ वर्षे, रा. एस. एम. जोशी हॉल जवळ, नाल्यालगत, दारुवाला पुल चौक, रास्ता पेठ, पुणे ( फिरस्ता). असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हयाची कबुली दिली असुन त्याचे ताब्यातुन दाखल गुन्हयातील ३४,०००/- रु किं चे एकुण ०४ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. आरोपीस पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री. अमोल झेंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-9 कडील वपोनि शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर पोउनि रमेश तापकीर पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, निलेश साबळे आण्णा माने अमोल पवार, आय्याज दड्डीकर, शंकर कुमार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!