प्रतिनिधी,

दिनांक ०७/०४/२०२३ रोजी फिर्यादी अमितकुमार विश्वकर्मा वय २१ वर्षे, रा. कोपरगाळी. लोहगाव पुणे हे एम. आय. टी. कॉलेजच्या समोर असतांना बड़गांव शिंदे रोड, लोहगांव पुणे येथे ४-५ मुले भांडणे करीत होती. सदरची भांडणे फिर्यादी सोडवत आहेत असा समज झाल्याने १) शंतनु शिवराज चाटे वय १९ वर्षे, रा. ज्ञान सागर पेट्रोल पंपाजवळ, साई गणेश सोसायटी, दुसरा मजला, वडगांव घेनद रोड आळंदी पुणे, २)विधीसंघर्षित बालक रा.सदर ३) दिलीप बाबुराव होंगे रा. साई पार्क सोसायटी, ज्ञानसागर पेट्रोल पंपाजवळ, वडगांव घेनंद रोड आळंदी पुणे यांनी फिर्यादीस अडवुन धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केली त्याबाबत विमानतळ पोलीस ठाणे पुणे येथे गु.र.नं. १७७/२०२३ ना.द.वि. कलम ३२६.३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी अमितकुमार कन्हैय्यालाल विश्वकर्मा यांचे वर हॉस्पिटल येथे उपचार चालु असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर सदर गुन्ह्यात भादवी कलम ३०२ चा अंतर्भाव करण्यात आला.

सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे दिलीप बाबुराव हांगे रा. साई पार्क सोसायटी ज्ञानसागर पेट्रोल पंपाजवळ, वडगांव घेनंद रोड, आळंदी पुणे हा गेल्याचार महीन्यापासुन फरार होता. दि.०५/०८/२०२३ रोजी दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -०४ चे पथक विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार संजय आढारी व पोलीस नाईक विनोद महाजन यांना त्याचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “एम. आय. टी. कॉलेज समोर वडगाव शिंदे रोड वर एका इसमाचा खुन करणारा आरोपी दिलीप हांगे हा निवडुंगवाडी ता.जि.बीड येथे असले बाबत माहीती मिळाली…

सदर बातमीच्या अनुषांगाने लागलीच वरिष्ठाच्या परवानगीने खाजगी वाहनाने गुन्हे शाखा युनिट ४. पुणे शहर कडील पथक निवडुंगवाडी ता. जि. बीड येथे रवाना झाले नेकनुर पोलीस ठाणे ता. जि.बीड येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने निवडुंगवाडी ता.जि.बीड येथे दिलीप बाबुराव होंगे वय २१ वर्षे, रा. ज्ञानसागर मंगल कार्यालया शेजारी, वडगाव रोड आळंदी, पुणे यास ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीस पुढील कारवाईकामी विमानतळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले..

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री सदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झंड, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्ह-२ श्री सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस हवालदार संजय आढारी, पोलीस हवालदार प्रविण भालचिम, पोलीस नाईक विनोद महाजन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!