प्रतिनिधी,

पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अहल गुन्हेगार नामे वैभव शैलेश गायकवाड उर्फ कुणाल गौतम कावरे वय २३ वर्ष, रा. गायरान वस्ती केशवनगर मुंढवा, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चंदननगर, विमानतळ, शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी रॉड, सत्तुर, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह गंभीर दुखापतीसह दरोडा, जबरी चोरी, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेरा बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालगतेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नगूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे व श्री राजु बहिरट, पोलीस उप-निरीक्षक पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ३७ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगाराचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!