प्रतिनिधी,

समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ते दिनांक ०२/०८/२०२३ रोजी दरम्यान मुकेश ट्रेडर्स, नानापेठ, पुणे हया बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. १०,०००/- रु.कि.चा सी. सी. टी. व्ही. डी. व्ही.आर मशीन सह एकूण रु ४,१००००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. म्हणून समर्थ पोलीस स्टेशन येथे मा. दं. वि.सं कलम ४५४.४५७,३८० प्रमाणे अज्ञात इसमाविरद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला. सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असताना अज्ञात चोरट्यानी दुकानातील सी. सी. टी. व्ही. चा डी. व्ही…

आर मशीन सोबत घेवून गेल्याने चोरटयांचे चेहरे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे घरफोडी झालेल्या दुकानाच्या

आजुबाजुचे सीसीटीकी तपासण्यास तपास पथकातील स्टाफने सुरवात केली घरफोडी करून आरोपी पळून गेलेच्या

दिशेचे जवळ जवळ १०० च्या वर सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता. एका आरोपीचा चेहरा एक सीसीटीव्ही

फुटेजमध्ये दिसुन आला असता त्या एका फुटेजचा आधार घेवुन पोनि सुनिल रणदिवे, व स्टाफ यांनी सदर:

इसमाची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेवू लागले परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही..

सदरव्यवत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर फुटेजमधील दिसत असणारा इसम हा पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी पार्सल वार्ड परिसरात थांबलेला आहे. सदर इसमास आरपीएफचे मदतीने ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने समय अधिक बळावल्याने सदर इसमास समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदाराचे मदतीने नाना पेठ येथील मुकेश ट्रेडर्स याठिकाणी बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. व १०,०००/- रु.कि.चा सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन ही घरफोडी केली असल्याचे कबुल करून त्याने स्वतः चे नाव सुरजीत भुवाल सरोज वय २३ वर्ष. रा. कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश असे सांगितले. तसेच त्याचे दोन साथीदार नामे- १) अजय उदरकुमार सरोज वय- १९ वर्ष, रा. कुंडा, प्रतापगड उत्तरप्रदेश ३२) गंगा सरोज रा. उत्तरप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहिती नसल्याचे सांगितले. अजय कुमार सरोज हा मार्केटयार्ड येथिल आबेडकरनगर पुणे या ठिकाणी असलेबाबत सुरजितने सांगितले, सदर अजय कुमार सरोज याला तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सदर वस्तीमधुन ताब्यात घेतले. सदर ताब्यात असलेले दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्या कडुन घरफोडी करून चोरून घेवुन गेलेला रु २,३०,०००/- मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री अविणकुमार पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परिमळ १ पुणे शहर, श्री संदीपसिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो स्टे श्री. सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे, यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि सुनिल रणदिवे, पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, गणेश वायकर, रोहिदास वाघेरे, रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, संदिप पचार, अर्जुन कुडाळकर, आरपीएफचे वपो.नि. रघुवंशी पुणे आरपीएफ, पोउपनिरी. उबाळे, पोलीस अमलदार दराडे, प्रशांत बोरसे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!