प्रतिनिधी,

डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इसम अनिशस्त्र व जीवंत, काडतुसे घेवून येणार असल्याबाबतची खात्रीलायक माहिती कक्ष ९, गु.प्र.शा., गु.अ.वि., मुंबई कार्यालयास प्राप्त झाली. सदर प्राप्त झालेल्या विश्वसनिय माहितीच्या अनुषंगाने का ९ च्या पथकाने बॉम्ब वायएमसीए इमारतीसमोर, न्यू लिंक रोड, डी. एन. नगर, अंधेरी (प.), मुंबई येथे सापळा रचून ०२ इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे खालील प्रमाणे शस्त्रास्त्रे मिळून आली.

१. एक लोखंडी गावडी कट्टा…

२. गावडी कटटयाचे तीन जिवंत काडतुसे,

३. तीन रामपुरी स्टीलचे बटण चाकू,

४. एक स्टेनलेस स्टिलचे पिस्टल,

५. पिस्टलचे २० जिवंत काडतुसे.

या बाबत त्यांच्याकडे केलेल्या चौकशी मध्ये सदर अग्निशस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. वरील दोन्ही इसम त्यांच्याकडे मिळून आलेल्या शस्त्र व काडतुसांचा वापर करून पुढील काही दिवसांमध्ये मुंबई शहरात चोऱ्या करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे वर नमुद शरत्रास्त्रे जप्त करून दोन्ही आरोपीविरोधात गुप्रशा, गुअवि विस्थागुरक्र. ५८ / २०२३ (डी. एन. नगर पोलीस ठाणे गुरक्र. ४८०/२०२३) कलम ३. २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७ (१) (अ) १३५ म.पो. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मा. वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा तपास कक्ष २ कडून करण्यात येत आहे.

अधिक चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने बळीत महिलेस धमकी

देवून बलात्काराचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तो मेघवाडी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. २७० / २०२३ कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२८, ३५४ सी ३५४डी ५००, ५०४, ५०६ भादविसह कलम ६६ ६६ ६७ ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम या गुन्हयातील पाहिजे आरोपी आहे. दोन्ही अटक आरोपींना दिनांक १०/८/२०२३ रोजी विहित वेळी मा. न्यायालयासमा रिमांडकरिता हजर करण्यात येत आहे. त्यानंतर मेघवाडी पोलीस ठाणे यांना त्यांच्या गुन्हयातील पाहिजे आरोपीचा ताबा घेण्याकरिता

कळविण्यात आले आहे. कक्ष २ ने केलेल्या कामगीरीमुळे सदर आरोपीकडून भविष्यात घडणाऱ्या अपराधांना

प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त (प्र-१) श्री. राज तिलक रौशन, पोलीस उपआयुक्त (प्र.) डॉ. बाळसिंग राजपुत, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-उत्तर) श्री. महेश देसाई यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दया नायक, पोनि श्री. सचिन पुराणिक, पोनि श्री. दिपक पवार, सपोनि श्री. उत्कर्ष वझे, सपोनि श्री. महेंद्र पाटील, मपोउपनि स्नेहल पाटील, सहा. पा. उनि काकडे, पो. ह. सुभाष शिंदे, सुनिल म्हाळसंक, संजय भोसले, जितेंद्र शिंदे, भिकाजी खडपकर, दुष्यंत कोळी, दत्तात्रय कोळी, सचिन राऊत, संतोष लोखंडे, महेश मोहिते, बाबासाहेब शेळके, राहुल पवार, पो.शि.क्र. वैभव पाटील, प्रशांत भुमकर, अमोल सोनावणे, शार्दुल बनसोडे, पो. ह. चा, विनायक परब, अविनाश झोडगे, पो.ह.ना.चा. शशिकांत निकम मपोशि साधना सावंत, प्राजक्ता धुमाळ यानी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!