प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने अतिक्रमणे करणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाने केलेली घोषणा हवेतच विरली आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये अनधिकृत हातगाडी, फेâरीवाले, स्टॉलधारक यांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या बेकायदा अतिक्रमणांवर प्रशासन कधी कारवाई करणार, अशी विचारणा केली जात आहे.

शहरातील रस्त्यांवर बेकायदा पथारी व्यावसायिकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने दूर केली जातील, अशी घोषणा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली होती. दिवसातून दोन वेळा अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे सूतोवाचही प्रशासनाने केले होते. मात्र, याचा विसर प्रशासनाला पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक, स्टॉलधारक आणि हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे रस्त्यांवरील फूटपाथवरून चालणेही अवघड झाले आहे.

पुणे शहरांमधील नामांकित असलेले एमजी रोड या ठिकाणी हात गाडी वाल्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी तर होतच आहे परंतु वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध असून सुद्धा बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेल्या हातगाडी मालक त्याजागी वाहन उभे करू नका अशी दमदाटी करताना चे दृश्य सतत दिसत आहे यामुळे नामांकित असलेले एमजी रोड या ठिकाणी सामान्य नागरिक त्रस्त होताना दिसत आहे

पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते पुन्हा एकदा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. बहुतांश अतिक्रमणांवर राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने ही अतिक्रमणे वारंवार उभी राहत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याची तक्रार केली जात आहे.

प्रशासनाने यावरती वेळीच प्रतिबंध लावला नाही तर सामान्य नागरिक त्रस्त होऊन अशा बेकायदेशीरपणे हात गाडी लावणाऱ्यांमुळे शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही हे एक कटू सत्य आहे तरी प्रशासनाने यावरती त्वरित कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीरपणे हातगाडी चालवणाऱ्या वरती कायदेशीर कारवाई करावी अशी सामान्य नागरिकांकडून चर्चा होत असताना दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!