प्रतिनिधी,

ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कुरीअर कपनीचे माल वाहतुकी दरम्यान अनोळखी इसमांनी अॅपल कंपनीचे फोन, आयपेंड तरोच डिजीटल वॉच असा एकुण ३.९०.४४५/- रु किचा मुद्देमाल चोरी केल्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१९३/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन युनिट-२ प्रभारी अधिकारी श्री नंदकुमार बिडवई यांनी सपोनि… वैशाली भोसले, पोलीस अमलदार गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे, साधणा ताम्हाणे, संजय जाधव, उज्वल मोकाशी, उत्तम तारु अशी टिम तयार करून, त्यांना गुन्हयाची उकल करण्यासाठी महत्वाच्या सुचना व मागदर्शन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने दिनांक ११/०८/२०२३ रोजी सपोनि वैशाली मोराल व युनिट-२ कडील टिम सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्य समांतर तपास करीत असताना युनिट-२ कडील पोलीस अमलदार, पुष्पेंद्र चव्हाण व अगोल सरडे यांना त्याच गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन संशयीत इसम पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग येथे चोरीचे महागडे फोन विक्रीसाठी आले असून ते ग्राहक शोधत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, युनिट-२ कडील वरील टिम तात्काळ पद्मावती ट्रॅव्हल्स पार्कंग जवळ सापळा रचुन शिताफीने संशयीत इसम नामे १) अभिजीत अरुन जाधव वय २६ वर्षे रा.गु.पो. मुकादम वाडी, कुरकुंभ, ता. दौड, जि.पुणे २) अक्षय संमाजी निंबाळकर, वय २३ वर्षे रा.मु.पो.मळद, ता. दौंड, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ३,९०,४४५/- रु किमतीचे ०५ नग अॅपल कंपनीचे आय फोन, ०१ नग अॅपल कंपनीचा आय पेंड व ०३ नग डिजीटल बॉच असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन वरील गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपीतांकडे प्राथमिक तपास केला असता त्यांनी ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कंपनीचा माल घेवुन जात असताना प्रवासा दरम्यान चोरी केल्याचे सांगुन गुन्हयाची कबुली दिलेली आहे. नमुद आरोपी है ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कंपनी मध्ये ड्रायव्हर क्लिनर म्हणुन नोकरीस असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीतांची वैदयकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कणिक. माअप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा.सहा. पो. आयुक्त गुन्हे श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट-र, पुणे शहर, सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोउपनि राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे, संजय जाधव, साधणा ताम्हाणे, उज्वल मोकाशी, उत्तम तारु, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, निखील जाधव, नामदेव रेणुसे, मोहसिन शेख शंकर नेवसे, राहुल राजपुरे, गणेश थोरात व नागनाथ राख यानी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!