प्रतिनिधी,

देशाच्या उल्लेखनीय उपलब्धी अधोरेखित करण्यासाठी तसेच कौशल्य विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय महासंवाद विभाग, गोवा आणि कोकण रेल्वे तसेच कदंबा परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कदंबा परिवहन विभागाच्या पणजी बस स्थानकात आणि मडगाव रेल्वे स्थानकात आगळ्यावेगळ्या ‘न्यू इंडिया’ सेल्फी पॉइंटचे उद्घाटन केले. या संयुक्त उपक्रमामुळे लोकांना आकृष्ट करून स्कील ईंडिया आणि चांद्रयान मोहिमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतील.

 

स्किल इंडियावर भर देण्याच्या उद्देशाने पणजी बस स्थानक आणि मडगाव रेल्वे स्थानक येथे उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट ‘चांद्रयान मिशन’ या संकल्पनेवर आधारित आहेत. यांना प्रवाशांनी अत्यल्प काळात प्रचंड प्रतिसाद दिला आहे. पणजी बस स्थानक आणि मडगाव रेल्वे स्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेले हे सेल्फी पॉइंट विविध वयोगटातल्या आणि समाजाच्या विविध क्षेत्रातल्या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

या मोहिमेमुळे जनमानसात संचारलेला उत्साह प्रकर्षाने जाणवत आहे. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती उत्साहाने या संस्मरणीय सेल्फी घेत आहेत. उत्तर प्रदेशाचे रितिक सेठ, यांनी देखील सेल्फी घेतला आहे. त्यांनी मडगाव रेल्वे स्थानकात बसविलेल्या या सेल्फी पॉइंटची प्रशंसा केली आहे. ते म्हणतात, “यातून नवीन भारताच्या उपलब्धी अधोरेखित होत आहेत. चांद्रयान मोहीम भारताच्या तरुणांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे.” सेठ यांनी स्वतःच सेल्फी घेतला नाही तर, त्यांच्या मित्रांना देखील सोबत घेऊन या प्रसंगाची आठवण म्हणून या ठिकाणी फोटो काढला.

 

 

न्यू ईंडिया सेल्फी पॉइंटचे आकर्षण केवळ सेठ यांच्यापुरतेच मर्यादित नाही, हे उघड आहे. अनेक प्रवासी या सेल्फी पॉइंटकडे आकर्षित झालेले दिसून आले. प्रत्येक सेल्फी म्हणजे जणू काही त्यांचा स्कील इंडिया कार्यक्रम आणि चांद्रयान मोहिमेला असलेला भक्कम पाठींबाच दाखवत होता. केंद्रीय महासंवाद विभाग, गोवा येथील एक अधिकारी म्हणाले, “जरी आम्ही सेल्फी घेणाऱ्यांच्या आकड्याची अधिकृतपणे नोंद ठेवत नसलो, तरी, हे उघड आहे की प्रवासी या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद देत आहेत आणि एकता तसेच उपलब्धींच्या आठवणी सोबत नेत आहेत.”

दोन्ही ठिकाणचे सेल्फी पॉइंट जनतेसाठी 17 ऑगस्ट पर्यंत खुले असतील. जास्तीत जास्त व्यक्तींना या नाविन्यपूर्ण प्रयत्नात सहभागी होण्यासाठी हा कालावधी वाढविण्यात आला आहे. हा आकर्षक उप्रकम भारताच्या उपलब्धी आणि उज्वल आणि अधिक कुशल भविष्यासाठी नागरिकांच्या सामाईक आकांक्षा यांचे प्रतीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!