प्रतिनिधी: शिराज शेख

(तक्रारदार हे काम करीत असलेले कंपनी मध्ये ठेवलेले भारतीय व परकीय चलनाचे असे मिळून ३,०७,४९२.१२ रुपये दि. ०७/०८/२०२३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्यावे अनुषंगाने तक्रार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३७२ /२०२३ मादविक ४५४.४५७.३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर तपास पथक प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाफ दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पॉलीस अमलदार विकास कदम, सुभाष जाव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला असता, आरोपी नामे फुरकान नईम खान, वय २५, रा. शिवा पोस्ट फ्लोरा, गरक फॅक्टरी, कमन ४५, ता. अलीशा, सेक्टर २९. जिल्हा पानिपत राज्य हरियाना हा निष्पन्न झाला त्याचा शोध घेत असताना तो दि. १२/०८/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड येथे मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्यांने दाखल गुन्हयाचे चोरी बरोबरच, सॅमसंग स्टोअर मोर मॉलजवळ, खराडी पुणे येथे देखील रात्रीची घरफोडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे व त्याने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३५५/२०२३ भादविक ४५७,३८० हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने दोन्ही ठिकाणा वरुन चोरी कलेल्या भारतीय व परकीय बलानातील रक्कम पैकी काही रक्कम त्याचे ताब्यातून जप्त करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परि. ४ श्री. शशिकात बोराटे, ना. सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, श्रीमती मनिषा पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) पो.उप-निरी अरविंद कुमरे, पो.उप-निरी दिलीप पालवे, पोलीस अमलदार सचिन कुठे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव गणेश हायगर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!