प्रतिनिधी,

मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील केशवनगर भागामध्ये शेजारी राहणान्या चैताली संदीप मोरे वय ३० वर्षे व सुधिर महादेव शिंदे, वय ३२ वर्षे रा. जनसेवा बँकेजवळ, पोटे हॉस्पीटल समोर, केशवनगर पुणे यांची अनुक्रमे दोन लहान मुले ही राहते घरासमोर खेळत असतांना रस्ता चुकून कोठेतरी भटकले असल्याने त्यांचे वरील नमुद पालक हे घाबरलेल्या आवस्थेत केशवनगर पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी आले होते. केशवनगर पोलीस चौकी येथील चौकी अधिकारी धनंजय गाडे, पोलीस उप-निरीक्षक यांनी प्रथम त्यांना धीर व आधार देवून त्यांचेकडे सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन लहान मुलांचे वय लक्षात घेता सदरच्या प्रकाराची गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांना माहिती दिली. सदर घटनेची दखल घेवून श्री. ताम्हाणे यांनी सदर मुलांचे फोटो पोलीस ठाणे तसेच नागरिकांच्या ग्रुपवर शेअर करून पोलीस ठाणे कडील तसेच चौकी स्टाफ करवी शोध घेणे बाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धनंजय गाडे व चौकी स्टाफ पोलीस अंमलदार सचिन बोराटे, प्रविण कोकणे यांनी तात्काळ केशवनगर पोलीस चौकी भागात शिवाजी चौक, पवार वस्ती. कुंभार वाडा, नदीपात्र भाग व इतरत्र भागामध्ये सदरचे बालकाचा शोध घेतला. एक ते दिड तासानंतर सदरचे मुले हे कुंभारवाडा नदीपात्र भाग परिसरात अस्वस्थ स्थितीत घाबरुन जावून भटकत असतांना मिळून आले. सदर मुलांना पोलीस अंमलदार सचिन बोराटे, प्रविण कोकणे यांनी ताब्यात घेवून केशवनगर पोलीस चौकी आणले. चिमुकल्या मुलांना पाहून मुलांचे आई-वडीलांचे डोळ्यातून आनंद अश्रू आले. सदर दोन्ही मुलांना पालकांचे ताब्यात दिले असता, त्यांनी पोलीसांनी तत्काळ केलेल्या सहकार्याबद्दल निशब्द होवुन आनंद अश्रूद्वारे पोलीसांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

सदरची कामगिरी, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, श्रीमती अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, प्रदिप काकडे यांचे सुचानाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार, सचिन बोराटे, प्रविण कोकणे, निलेश पालवे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!