प्रतिनिधी,

मा. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर याचे विरुध्द माहिती काढून कारवाई करणे बाबत दिलेले सुचना व आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १७-०८-२०२३ रोजी कोचया पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना माहिती मिळाली की, पुणे गोकुळनगर येथील लेन नंबर १ मधुन कात्रज कोंढवा रोडकडे जाणारे स्नेहदत्त बिल्डींग जवळ, एक इसम अफिम हा अमली पदार्थ विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत कायदेशिर सोपस्कार पार करून छापा कारवाई केली असता इसम नागे सुमेर जयरामजी बिष्णोई वय ५० वर्षे, रा. C/w धनराज देवकाते, सर्व्हे नंबर ४८ / २, गोकुळनगर, लेन नं. १, शिवप्रतिष्ठान चौक कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे मुळ रा. जयराम अंन्दनियोकी दानिया, हनुमानसागर, तहसिल बावडी, जि. जोधपुर राज्य राजस्थान हा त्याचे ताब्यात ६४,४९,०००/- रु.चा ऐवज त्यामध्ये किं.रु. ६४.२८,०००/- चा ०३ किलो २१४ ग्रॅम आफिम हा अमली पदार्थ विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचे विरुद्ध कोंढवा पो स्टे येथे गु.र.नं. ८४१ / २०२३. एनडीपी एस. अॅक्ट ८ (क). १७ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा उपास सहा.पो.निरीक्षक, शैलजा जानकर अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे हया करीत आहेत. आरोपीची पोलीस कस्टडी रिमाड घेण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपीने सदरचा अफिम हा अमली पदार्थ त्याचे साथीदार ०२. चावडसिंग मानसिंग राजपुत ०३ लोकेंद्रसिह महद्रसिंह राजपुत याचेकडुन आणला असुन आणखी अफिम या अमली पदार्थांचा साठा त्याचेकडे असल्याचे सांगितल्याने त्याबाबत गुन्हयाचे तपास अधिकारी सहा. पो. निरीक्षक, श्रीमती शैलजा जानकर यांनी तपास करून नमुद दोघाना अटक करून त्यांचेकडुन ५२.२५,२०० चा ऐवज त्यामध्ये कि रु ५२,०४,०००/- चा ०२ किलो ६०२ ग्रॅम अफिस हा अमली पदार्थ मोबाईल फोन असा जप्त करण्यात आला आहे..

अशा प्रकारे आरोपी नामे ०१ सुमेर जयरामजी बिष्णोई ०२ चावडसिंग मानसिंग राजपुत ०३ लोकेंद्रसिंह महेंद्रसिंह राजपूत यांना गोकुळनगर काढवा परिसरातून ताब्यात घेवुन अटक करुन त्यांचेकडुन एकुण १.१६,७४०००/- रु चा ०५ किलो ८१६ ग्रॅम अफिम हा अमली पदार्थ जप्त करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कणिक, मा.पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा.श्री. अमोल झेंडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.सहा.पो. आयुक्त गुन्हे १. पुणे श्री. सुनिल तावे याचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अमलदार, पाडुरंग पवार, सचिन माळवे सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, संदिप शिर्के, संदेश काकडे, नितेश जामव, रेहाना शेख योगेश मोहिते यानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!