प्रतिनिधी,

गा. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार यांनी पुणे शहरातील रॉबरी, घरफोडी चोरी, चैन स्नॅचींग तसेच पाहीजे / फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवून रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग करण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी, श्री नंदकुमार बिडवई, म सहा.पो.निरी वैशाली भोसले व युनिट-२ कडील पोलीस अमलदार, मोकाशी, जाधव, सरडे, सोनुने, जाधव, चव्हाण यांची टिम तयार करून, त्यांना महत्वाचे मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.

आजरोजी पेट्रोलींग दरम्यान युनिट-२ कडील पोलीस अगलदार, गजानन सोनुने व संजय जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉडवरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम नामे जयवंत ऊर्फ जायड्या गायकवाड हा मिनाताई ठाकरे वसाहती येथील भिम दिप मित्र मंडळाचे जवळ चोरीचे सोन्याचे दागीने विकण्यासाठी टी. व्ही एस (अपाची) कंपनीची गाडी क्रमांक एम.एच./१४/एफ.एल.७७२७ या गाडीसह आलेला आहे. सदरबाबत युनिट-२ चे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर युनिट-२ कडील अधिकारी व अमलदार यांनी बातमीचे ठिकाणी खाजगी वाहनाने जावुन सापळा रचुन शिताफीने दि.२०/०८/२०२३ रोजी जयवंत ऊर्फ जायड्या गोवर्धन गायकवाड, वय-३४ वर्षे, रा. डी. पी. रोड, आंबेडकर वसाहत, आंध, पुणे यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यातून १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. टि. की. एस. (अपाची) दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशिन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यारे असा सर्व मिळून किमत ६.३०,७५०/- रु किया मुद्देमाल मिळुन आलेला असुन समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं.१८६/२०२३.भा.द.वि. कलम ४५४, ४५७.३८० प्रमाणे गुन्हयाची उकल करण्यात युनिट-२ ला यश आले आहे. पुढील तपासकामी समर्थ पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल घरफोडी चोरी करणारा इसम असुन तो गेल्या महिन्यामध्ये जेल मधुन जामीनावर बाहेर आलेला होता.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे गा.सहा. पो. आयुक्त गुन्हे-” श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार बिडवई.. म. सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिले, पोलीस अमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण.. संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, प्रमोद कोकणे, गणेश थोरात यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!