प्रतिनिधी,

शिवाजीनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं. १६८/२०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्हयाचे समातर तपासकामी मा. पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शक सुचना व आदेशाप्रमाणे नमूद गुन्हयाचे तपासकामी पोलीस उप निरीक्षक शेख, व स्टाफ असे खाजगी वाहनाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोना ७५५९ रविंद्र लोखंडे व पोना ७६०८ आजीनाथ येडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा हा गुन्हे अभिलेखावरील सोन्याच्या बांगड्या कटींग करुन चोरणारा गुन्हेगार नामे संतोष जाधव व त्याचा साथीदार यांचेसह मिळुन केलेला असून ते दोघेही वाडीया कॉलेजकडुन कोरेगाव पार्क कडे जाणा-या सार्वजनिक रोडच्या कडेला असलेल्या अभिनंदन कडक स्पेशल चहाचे हॉटेलच्या दु-व्हिलर पार्किंगजवळ उभे असले बाबतची गोपनिय माहिती मिळाल्याने सदर बादत मा. पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा, पुणे शहर याना कळविले असता त्यांनी आरोपींचा शोध घेऊन कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने वर नमुद केले अधिकारी व स्टाफ असे सदर ठिकाणी जावून वर नमुद इसमांचा शोध घेतला असता ते सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यांना आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे पत्ते १) संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव, वय ४१ वर्षे, रा. मांजरी बुद्रुक, पवार बिल्डींग, वरद हॉस्पिटल, हडपसर, पुणे व मुळगाव काळंगरी, पो. औलद, ता. जि. गुलबर्गा व दुधणी ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक, २) सुधीर ऊर्फ तुंडया नागनाथ जाधव वय ४५ वर्षे रा.शास्त्री नगर साईनाथ मंदीरा शेजारी अंबरनाथ वेस्ट जिल्हा ठाणे सध्या पुणे फिरीस्ता असे असल्याचे सांगितले.दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने वर नमुद आरोपींकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने व त्यांचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे ताव्यातुन किं.रु.१,२०,०२५/- ची एक २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली व कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींना पुढील कारवाई करीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे ५ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ मुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर पोलीस उप निरीक्षक शाहिद शेख पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, आजिनाथ येडे, गणेश ढगे, धनजय ताजणे मॅगी जाधव, पोलीस अमलदार शिवाजी सातपुते सुमित ताकपेरे, महेश पाटील श्रीकात दगडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!