संपादक: शहानवाज मुलानी

 

पुणे .संगमवाडी पार्किंग मध्ये येणाऱ्या प्रवाशांना पाचशे रुपयात मोबाईल म्हणून मोबाईलचा आमिष दाखवून व जास्त पैशाचा आमिष दाखवून जबरदस्तीने लुबाडण्याचा काळा पिवळ्याचा अवैधरित्या ऑनलाईन धंदा जोमाने सुरू आहे. हा धंदा चालवण्यासाठी युपी बिहारचे सराईत गुन्हेगार व गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हा धंदा चालवीत आहे. येथील स्थानिक व्यक्ति व त्याचे आणखी २ साथीदार ह्या धंद्यावरती पाहणी करतात. व हा धंदा .संध्याकाळी.६ते११ वाजेपर्यंत चालतो. येणाऱ्या प्रवाशांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या अकाउंट मधील सर्व पैसे काढून घेतात. व यांच्यासोबत यांचे साथीदार ऑनलाईन मनी ट्रान्सफर म्हणून तिथे उपस्थित असतात. सदरील व्यक्ती हा त्या कस्टमरला घेऊन त्या व्यक्तीकडे जातो व कॅश काढून त्याला ऑनलाइन ट्रान्सफर करून कॅश देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पार्किंग मध्ये हा अवैध व्यवसाय चालू असून पोलीस प्रशासन काय करत आहे? काळे पिवळ्या जुगार वाल्यांना पोलीस प्रशासनाची भीती नाही का? ११२ कंट्रोल ला वारान वार कॉल करून देखील हा व्यवसाय सुरू आहे ह्या अवैध व्यवसाय वरती कारवाही का होत नाही?असा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण होत आहे. तरी लांबून येणार्‍या प्रवाशांना लुटून हे आपापली पोट भरण्याची काम करत आहेत. पोलीस प्रशासन यांच्यावरती कार्रवाई करेल का ?अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तरी संबंधित जुगार चालवणारा मालक व यांच्या साथीदार यांच्यावरती जुगार कलम.१८८७ नुसार कडक कार्रवाई पोलिस प्रशासन करेल का?अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. ह्या वरती येरवडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी कार्रवाही करतील का?अशी चर्चा देखील नागरिकांना मध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!