प्रतिनिधी: संकेश यादव

यातील फिर्यादी व त्यांचे मित्र असे त्यांच्या राहते घरासमोर असताना फिर्यादी यांचे ओळखीचे १) अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी, वय २२ वर्षे रा. बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर पुणे (टोली प्रमुख) २)कुलदिपसिंग ऊर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी वय २१ वर्षे, रा. बिराजदारनगर, हडपसर पुणे ३)विशाल ऊर्फ नॅक्स किशोर पुरेबीया वय २२ वर्षे रा. जुना म्हाडा कॉलनी बि.नं. १६. रुम नं.१० वेदवाडी, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी व त्यांचा मित्र यांना काहीएक कारण नसताना शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादीस फ्लॅक्स व बॅनर लावण्याचे काम करावयाचे असेलतर आम्हाला प्रत्येक महिन्याला तुला हप्ता दयावा लागेल असे म्हणुन फिर्यादी यानी सदर आरोपीतास ५,०००/- रुपये हप्ता देवुन त्यांनी सद्या माझ्याकडे आता पैसे नाहीत माझ्याकडे पैसे आल्यानंतर तुम्हाला देतो असे म्हणल्याचे कारणावरून आरोपीतानी फिर्यादी यांचे दोन्ही हाल पाठीमागुन पकडुन तुला फार मस्ती आली आहे तु कसा हप्ता देत नाही ते बघतो असे म्हणून फिर्यादी यांना जीव मारण्याची धमकी देवून त्यांचे डाव्या डोळयावर व छातीच्या डाव्या बाजुस धारदार शस्त्राने गारुन त्यांचेकडील धारदार शस्त्र हवेत फिरवुन सदर परीसरात दहशत निर्माण करून आम्ही येथील भाई आहे असे बोलून, फिर्यादी यांना तक्रार केलीतर मारुन टाकण्याची धमकी दिली म्हणून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ११३५/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३८४, ३२४,५०४, ५०६, ३४, महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७(१) १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वपासा दरम्यान बातील अटक आरोपी नागे १ ) अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी, वय-२२ वर्षे, रा. बिराजदारनगर, वैदवाडी, हडपसर पुणे (टोळी प्रमुख) २) कुलदिपसिंग ऊर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी, वय-२१ वर्षे, रा. बिराजदारनगर, हडपसर, पुणे ३) विशाल ऊर्फ मॅक्स किशोर पुरेबीया, वय-२२ वर्षे, रा. जुना म्हाडा कॉलनी वि.नं.१६,रूम नं. १० वेदवाडी, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) या आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी अक्षयसिंग निरुसिंग जुनी (टोळी प्रमुख) यांनी त्यांचेसह अन्य सदस्यासाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही समाईक व काही नविन साथीदार याना सोबत घेवुन, संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी घातक शस्त्र जवळ बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांसह गंभीर दुखापत, घरफोडी,चोरी सारख गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हा केले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने बेकायदेशीरपणे स्वतः चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सदरचे गुन्हे केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने, प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२) ३(४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र शेळके यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

 

सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ११३५/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३८४,३२४,५०४, ५०६,३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (५) सह १३५, क्रिमिनल लॉ अॅमॅडगेड अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२) ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर, श्रीमती . अश्विनी-केदार हया करीत आहत..

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा पोलीस उप- आयुक्त परीमंडल-4 पुणे, श्री.विकांत देशमुख, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख-केदार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे श्री रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री संदिप शिवले, म सहा. पो. निरीक्षक, सारिका जगताप, सहा. पो. निरीक्षक, दिपक बर्गे, तसेच निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, गिरीष एकोंगे, अंकुश निकम, राकेश चव्हाण व म. पोलीस अमलदार, खरे यानी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिरा विरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५१ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!