प्रतिनिधी,

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.६१८/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरी गेलेली १९,००,०००/- रु. किं.ची. फॉर्म्युनर गाडी व अज्ञात आरोपीचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अमलदार करत असताना पोलीस शिपाई ८६६६ अमोल सस्तापे व पोलीस शिपाई ८८३२ संदीप येळे असे दोघांनी मिळुन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व तांत्रिक विश्लेषणाचे सहाय्याने १) राजेश राधेश्याम पंडीत वय ३७ वर्षे राधयतुरागाव राम स्वरुप शाळेजवळ तालुका जिल्हा आग्रा उत्तरप्रदेश २) मनोज महेंद्र परीहार (ठाकुर) वय ४२ वर्षे, रा. नगला अहीरगाव तहसील हाथरस जंक्शन जिल्हा हाथरस उत्तरप्रदेश व ३) इस्माईल शब्बीर अहमद खान, वय ३७ वर्षे, रा.शास्त्रीपार्क बलुंद मस्जीदजवळ गल्ली नं. १ ईस्ट दिल्ली ४) गोरखनाथ उर्फ पप्पू साळवे वय ४१ वर्षे रा. फ्लॅट नं.५ अमरनाथ अपार्टमेंट काळेवाडी फाटा पुणे यांना निष्पन्न करुन त्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हददीत पुणे-सोलापुर रोड वरील थेऊर फाटा कुंजीरवाडी लोणीकाळभोर पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेकडुन दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली १९,००,०००/- रु. किंमतीचा फॉर्म्युनर गाडी ही व सदरची गाडी चोरी करणेकरीता वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण २०,८०,८००/- चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे ते सदर गाड्या कशाप्रकारे चोरी करायचे याबात चौकशी केली असता, प्रथम ते महागड्या गाड्याची रेकी करुन स्क्रू ड्रायव्हरचे सहाय्याने गाडीची काच फोडुन, ते त्यांचेकडील केसी १०० एक्स टुल ड्युप्लीकेट चावी बनविणेचे एक्सपेंड इलेक्ट्रॉनिक्स मशीन गाडीतील वायरींगला जोडुन सदर गाडीचा सॉफ्ट डाटा ट्रान्सफर करुन घेत होते. त्यानंतर ते त्यांचेकडील प्रोग्राम कॉपी करणेचे लहान निळे रंगाचे युनिट सदर एक्सपेंड मशीनला ओबीडी १६ कॉड केबल सहाय्याने जोडुन ड्युप्लीकेट चावी मध्ये तो डाटा ट्रान्सफर करून, ड्युप्लीकेट चावी बनवत होते. सदर ड्युप्लीकेट चावीचे सहाय्याने ते गाडी चालु करुन चोरी करीत होते. त्यानंतर ते सदर गाडीस ड्युप्लीकेट नंबर लावुन त्याचे बनावट स्मार्टकार्ड तयार करून, सदरच्या महागड्या गाड्या गुजरात येथे गहाण ठेवत असे. वगैरे माहिती सांगितली.

सदर आरोपी यांना विश्वासात घेवुन त्यांनी आणखी चारचाकी वाहन चोरीचे गुन्हयांबाबत तपास केला असता त्यांनी सुमारे १० दिवसापुर्वी नाशिक येथून एक टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार चोरी करुन ती राजस्थान येथे दिली असलेचे सांगितले आहे त्याबाबत आम्ही नाशिक येथील गंगापुर पोलीस स्टेशनशी संपर्क करुन माहीती घेतली असता सदस्बाबत गंगापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. २००/ २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असलेची माहीती प्राप्त झालेली आहे.

सदर आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत… (१) लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६१८ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ (२) गंगापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २०० / २०२३ भा. द. वि. कलम ३७९

यातील आरोपी क्रमांक १ ते ३ यांचेवर गाझीयाबाद व नोएडा येथे वाहन चोरीचे अशाच प्रकारचे 3 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!