प्रतिनिधी,

आर. ए. के. पोलीस ठाण्याच्या हददीत मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेवून येणाऱ्या इसमाबाबत कक्ष ९, गु.प्र.शा., मु.अ.वि., मुंबई यांना दिनांक २१/८/२०२३ रोजी विश्वसनिय माहिती प्राप्त झाली. सदर प्राप्त झालेल्या विश्वसनिय माहितीच्या अनुषंगाने कक्ष ९ व्या पथकाने आदमजी जीवाजी चाळ समोर, मुदक्कस मस्जीद समोर, शिवडी क्रॉस रोड, शिवडी, मुंबई १५ येथे सापळा रचून ०१ इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती मध्ये खालील प्रमाणे अंमलीपदार्थ मिळून आले.

एकुण १०२८ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाचा साठा. सदर मिळून आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे सुमारे २ कोटी ४ लाख रुपये एवढी किंमत आहे.

वर नमुद अंमली पदार्थाचा साठा जप्त करून आरोपीविरोधात या प्रकरणी गु.प्र.शा., गु.अ.वि. वि. स्था. गु.. २.क्र. ६३/२०२३ (आर.ए.के. पोलीस ठाणे गु.र.क्र. २९९/२०२३) कलम ८ (सी), २२ (सी), २९ एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपी याचा अभिलेख तपासला असता, त्याच्या विरोधात २ गुन्हे नोंद असून, त्यास मा. न्यायालयाने दि. २५/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. सदर

गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ९ कडून करण्यात येत आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त (प्र- १) श्री. राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण- पश्चिम) श्री. महेश देसाई यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. दया नायक, , पो. नि सचिन पुराणिक, पो.नि दिपक पवार, स.पो.नि उत्कर्ष वझे, स. पो. नि महेंद्र पाटील, पो. ह. सुनिल म्हाळसंक, भिकाजी खडपकर, सचिन राऊत, महेश मोहिते, राहुल पवार, पो.शि. प्रशांत भुमकर, पो.ह. चा.. अविनाश झोडगे, पो.ह. ना. वा. शशिकांत निकम यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!