प्रतिनिधी,

फिर्यादी हे रामकृष्ण मठाचे गेट शेजारी दांडेकर पुल पुणे येथून शतपावली करण्यासाठी पायी जात असताना, आरोपीत नामे संकेत देविदास लोंढे, प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजथने व इतर तीन विधिसंघर्षित बालक यांनी फिर्यादी यांचेजवळ येवुन त्यापैकी एका विधिसंघर्षित बालकाने फिर्यादी यांना तु व तुझा मित्र यांनी माझ्या बहीणीला का छेडले असे म्हणुन फिर्यादी यांची कॉलर पकडुन मारहाण करून इतर आरोपीत संकेत देविदास लोंढे, प्रतिक ऊर्फ चिटया पांडुरंग कावळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजधने यांनी शिवीगाळ व लाथा-बुक्यांनी मारहाण केली. विधिरार्धषित बालक याने थांब तुला संपवुन टाकतो जसे बोलुन एक धारदार हत्यार काढुन भाई लोकांना शिवी देतो का तुला खल्लास करतो असे म्हणून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देश्याने फिर्यादी यांचे गळ्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कला. त्यावेळी फिर्यादीने तो चुकविला. त्यानंतर फिर्यादी यांच्या वसाहती मध्ये येऊन कोयता हवेत फिरवुन पोलीसात तक्रार दिली तर एक-एकाचा मर्डर करुन टाकेन अशी धमकी देऊन सदर परीसरात दहशत निर्माण केली. म्हणुन पर्वती पोलीस स्टेशन येथे पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं.२१७/२०२३, भा.दं.वि.क.३०७,४५२. १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५). म.पो.अधि.कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) संकेत देविदास लोंढे, वय-२० वर्षे, रा. गल्ली नं.१३. व्यास शॉप जवळ, जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार २) प्रतिक ऊर्फ विटया पांडुरंग कांबळे, वय-२० वर्षे, रा. स.नं. १२२, चुनाभट्टी, सिंहगड रोड, पुणे ३) अजित ऊर्फ आज्या संजय तायडे वय-२० वर्षे, रा. गल्ली नं. ६, जनता वसाहत, पुणे ४) शुभम दिगंबर गजधने वय- १९ वर्षे, रा. स.नं. १३४, परिवर्तन बिल्डींग, दांडेकर पुल पुणे तसेच ०३ विधिसंघपित बालक (टोळी सदस्य) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने यातील अ.क्र. १ ते ४ यांना अटक करण्यात आली आहे.

वरील नमुद आरोपीत व विधिसंघर्षित चालक यांची पूर्व रेकॉर्डची पाहणी करता यातील आरोपी नामे संकेत देविदास लोंढे (टोली सदस्य) याचेविरुध्द एकुण ०६ गुन्हे दाखल असुन त्याने त्याचे साथीदार प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजपने यांचेसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या

वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा चाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून, संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट संकेत लोंढे याने तयार करून मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न, दुखापत किंवा हमला इत्यादी करण्याची धमकी देवुन किंवा हमला इत्यादी करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण बेकायदेशीर जमाव जमवणे दुखापत बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणणे इत्यादीची धमकी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे हे अवैध मागाने स्वतः साठी व इतरासाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी टोळीचे वर्चस्वा साठी च दहशत कायम ठेवुन सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती. नमुद आरोपी यांचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत…

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(४) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर कायद्याचे कलम २३ (१) अ अन्वये मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव श्री. जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन, पुणे यानी मा पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३ पुणे शहर श्री सुहेल शर्मा यांचेमार्फतीने मा अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रविणकुमार

पाटील यांना सादर केला होता. सदर प्रकरणी छाननी करून पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. २१७/२०२३ भा.द.वि.क. ३०७,४५२,१४३, १४४, १४७, १४८, १४९३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४ (२५). म.पो.अधि. कलम ३७ (१) १३५ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर

पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रविणकुमार पाटील यांनी पूर्व मान्यता दिलेली आहे.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, पुणे शहर श्री. अप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.

सदर कारवाई मा.पोलीस आयुक्त पुणे शहर. श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त. पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३ श्री सुहेल शर्मा, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड पुणे श्री. अप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे पोलीस अंमलदार, दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली आहे..

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५३ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!