प्रतिनिधी: संकेश यादव

तक्रारदार यांना एका अज्ञात नंबर वरून फोन करुन कुत्रे आजारी असल्याचे खोटे सांगुन दि. ९/८/२०१३ रोजी वडकी येथील निर्जन स्थळी बोलावुन अनोळखी इसमानी त्याना एका नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी क्वीड कंपनीचे गाडीत जबरदस्तीने बसवुन त्यांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची चमकी देवून तुमचे पत्नीने व मेहुण्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगीतले तसेच त्यांचा मोबाईल व घराचे चाव्या जबरदस्तीने घेवुन त्यांचे घरातुन २५,००,०००/- लाख रुपये रोख व २,१०,०००/- रु. किं चे सोन्याचे दागीने ते अनोळखी इसम घेवुन गेले म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारी वरून ५१४ / २०२३ मा द वि कलम ३६४ (अ), ३८६ ३९७ ५०६ (२) ३२३, ३४ माह का ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस उपायुक्त परि. ०५ पुणे शहर श्री. चिक्रात देशमुख तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अश्विनी राख, तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अमित गोरे व स्टाफ यांनी तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण केले असता तपासा दरम्यान असे दिसुन आले की यातील आरोपी यानी अत्यंत चालाखीने व नियोजन बध्द रितीने कट रचुन कोणताही पुरवा पाठिमागे राहणार नाही यावी पुरेपुर दक्षता घेतली होती. तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेजचे आवारे आरोपी निष्पन्न करण्यात तपास पथकांनी यश मिळवले. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता सदर घटनेची अशी उकल झाली की ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले.

तक्रारदार हे त्यांचे दुसऱ्या पत्नी सोबत राहण्यास असून त्याचे पहिले पत्नीची घटस्फोटाची केस न्यायालयात चालु आहे. त्यामध्ये फिर्यादी यानी त्याचे पहिले पत्नीस पोटगी रक्कम म्हणून २०,००,०००/- रुपये देणे बाबत न्यायालयाचे आदेश झाल्याने फिर्यादी यांनी सदरचे रक्कमेची जुळवा जुळव करून रक्कम घरात आणुन ठेवली होती. फिर्यादी यांची दुसरी पत्नी ही तीचे माहेरी बार्शी सोलापुर येथे गेली होती. परात बोलता- बोलता तिथेकडुन नव-याने घरात आणुन ठेवलेल्या पैशांचे बाबत तिवी भावजय हिला समजते त्याप्रमाणे तिने तिचा मित्र राहुल निकम, व त्याचे इतर साथीदार यांना सोबतीला घेऊन फिर्यादी यांना लुटण्याचा कट रचला होता.

गुन्ह्यामधील आरोपी राणी पाटील हि तिने डॉक्टराना फोन करून त्यांचे घरा पासून फार लांब नसलेल्या अंतरावर कुत्र आजारी असल्याचे सांगुन बोलावून घेतले त्यानंतर बाकी साथीदारानी डॉक्टराचे जबरदस्तीने अपहरण करून प्लॅन नुसार त्यांनी नियोजन बध्द गुन्हा करून डॉक्टरांना लुटले. परंतु लोणी काळभोर पोलीसाचे कौशल्यपुर्ण तपासा मुळे यातील आरोपी १) माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षिरसागर. मुळ रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापुर जि. पुणे सध्या रा. मु. पो. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापुर २) राहुल दत्तु निकम, वय २७ वर्षे, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे ३) नितीन बाळु जाधव, वय २५ वर्षे, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे ४) सुहास साधु मारकड, वय २८ वर्षे, रा. मु. पो. पडस्थळ, ता. इंदापुर, जि. पुणे ५) विदया नितीन खळदकर, वय ३५ वर्षे, रा. ढगे मळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी जि. सोलापुर ६) संतोष धोंडीबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील वय ३४ वर्षे, रा. मुळ रा. जगलबेट, ता. जोथाडा, जि. कारवार, कर्नाटक सध्या. मु. पो. लोणी देवकर, ता. इंदापुर, जि. पुणे हे आरोपी निष्पन्न झाले असून पोलीसांनी त्यांना अटक केली असुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली दोन कार, दोन मोटार सायकल, तक्रारदार यांचा मोबाईल हॅन्डसेट, तसेच आरोपीठांचे वापरते एकुण ६ मोबाईल हॅन्डसेट, सोन्याचे दागीने तसेच गुन्हयात तुटलेली बारा लाख रुपये रोख रक्कम असा एकूण २२,५५,०००/- रु. कि. या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्याचा पुढील तपास पो. उप-निरी अमित गोरे हे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, श्रीमती अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली मो. उप निरी अमित गोरे, पोलीस अमलदार नातपुते, गायकवाड, बोरावके, सायकर, देविकर, नागलीत, जाघत, कुदळे शिरगीरे, विर. पाटील, सोनवणे, म.पो.शि फणसे, यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!