प्रतिनिधी,

तक्रारदार महिला ह्या मथुरा होसींग सोसायटीचे जवळ हायफाय फॅशन कपडयाचे दुकानासमोर, संघर्ष चौक, चंदननगर पुणे येथे फिर्यादी व त्यांचे सोबत इतर तीन महिला कपड़े घेणेसाठी पायी चालत जात असताना, त्याचे समोरून लाल काळ्या रंगाचे मोटार सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून जबरीने चोरी करून पळुन गेले बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं ३८९ / २०२३ भादवि कलम ३९२ ३४ अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे…

चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथक व प्रभारी अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्हयातील आरोपीचा गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे अधिक तपास करून शोध घेत असताना, आरोपी १) ओंकार रामकिसन गायकवाड, वय २० वर्षे रा.एल.एन.टी फाटा, चाकण रोड, शिक्रापुर पुणे हा अपराध केल्या पासुन पसार झाले असल्याचे व तो सांगली जिल्हयात शिराळा तालुक्यात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावरून, त्यास दिनाक २३/०८/२०२३ रोजी शिराळा तालुका, जिल्हा सांगली येथून ताब्यात घेवुन अटक करणेत आलेली आहे.

ओंकार गायकवाड व त्याचा साथीदार यांनी मंगळसूत्र जबरीने दोरी करतेवेळी वापरलेली सुमारे २ लाख रूपये किंमतीची बजाज डॉमीनोर ४०० सीसी गाड़ी एमएच ०१ / सीझेड २५९७ ही त्याचेकडून जप्त करणेत आलेली असून दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे,

सदरची कामगिरी ही मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त, थेरवडा विभाग श्री संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर श्रीमती मनिषा पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथक प्रभारी अधिकारी पो.उप-निरी अरविंद कुमरे पोलीस अमलदार अविनाश सकपाळ अस्लम अत्तार सचिन रणदिवे सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवाजी घांडे श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!