प्रतिनिधी: संकेश यादव

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि एसईसीओ संचालक हेलेना बडलिगर यांच्यात आज नवी दिल्ली येथे अत्यंत यशस्वी बैठक झाली. जयपूर येथे झालेल्या जी 20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या यशस्वी समारोपानंतर ही बैठक झाली आणि ती भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) देशांच्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक संबंध वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.

बैठकीदरम्यान, पीयूष गोयल आणि बडलिगर यांनी भारत आणि ईएफटीए देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत भारत आणि ईएफटीए यांच्यातील व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) साठी चालू असलेल्या वाटाघाटींमध्ये झालेल्या प्रगतीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हितकारक व्यापार करार साध्य करण्याच्या त्यांच्या सामायिक दृष्टीकोनाचा पुनरुच्चार केला जो भारत आणि ईएफटीए दोन्ही देशांच्या उदयोन्मुख आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब दर्शवितो. दोन्ही प्रदेशातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणारा करार तयार करण्यासाठी प्रमुख समस्या आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या महत्त्वावर चर्चेत भर देण्यात आला. टीईपीए वाटाघाटींमधील सहयोगी प्रयत्न हे भागीदारीचे महत्त्व आणि या वाटाघाटींचे यश सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांचे समर्पण अधोरेखित करतात.

या बैठकीची परिणती म्हणजे भारत-ईएफटीए व्यापार संबंधांमध्ये एक सकारात्मक पाऊल पुढे टाकण्याचा संकेत जो दोन्ही प्रदेशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य आणखी मजबूत करेल. व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्याची वचनबद्धता ही भारत आणि ईएफटीए दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि समृद्धीसाठी हितकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!