प्रतिनिधी,

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर याचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २. पुणे शहर याचे कल्पनेतून परिमंडळ-२ मधील पोलीस अधिकारी व पोलीस अगलवार यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

सदरच्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते श्री राजेंद्र भिडे यांनी ‘सवाद कौशल्य श्रीमती सीमा देसाई नायर यांनी मनाची भाषा’ व ‘न्यूरोल्यूजेस्टीक चे दैनंदिन जीवनातील फायदे व श्री नारायण शिरगावकर सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यानी समज गैरसमज तसेच डॉ. दत्ता कोहीनकर यांनी ‘तणावमुक्त जीवन या विषयावर उत्तमप्रकारे मार्गदर्शन करून सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेमध्ये तणाव मुक्ती करून दैनंदीन जीवनात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच मा. श्रीमती स्मार्तना पाटील (भापोसे), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्या अडचणी व सुचना ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करून, त्याच्यातील आत्मविश्वास मनोबल वाढविण्यासाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वारगेट पोलीस विभागाचे सहा. पोलीस आयुक्त, श्री. नारायण शिरगावकर, श्री. सुनिल झावरे, परिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन, श्री सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे स्वारगेट पोस्टे स्वारगेट पोस्टे कडील सपोनि संदे, सपोनि काकरे सपोनि अम्बिनी बावचे पोलीस उप निरीक्षक श्रीमती राजश्री पाटील, श्रीमती किती चाटे, पोलीस उप-निरीक्षक येवले व स्वारगेट पोस्टे कडील सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेवून सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे परिमंडल-२ विभागातील एकूण १६ पोलीस अधिकारी व ११२ पोलीस अमलदार यांनी देखील सदर कार्यशाळेमध्ये सहभागी होवून प्रोहत्सान दिले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे स्वारगेट पोस्टे पुणे शहर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!