प्रतिनिधी : संकेश यादव

जागतिक मंदी असूनही, सेवा क्षेत्राच्या निर्यातीने उल्लेखनीय कामगिरी केली : मुख्य आर्थिक सल्लागार

खाजगी क्षेत्राने जाहीर केलेले नवीन गुंतवणूक प्रकल्प आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत मागील 14 वर्षांपेक्षा सर्वाधिक आहेत: मुख्य आर्थिक सल्लागार

वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सांगितले की, भारताचा वार्षिक 7.8% विकास दर इतर अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकास दरापेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या शेवटच्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासाने मजबूत गती कायम राखली असे त्यांनी नमूद केले.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाही (Q1) साठी सकल देशांतर्गत उत्पादन(जीडीपी) ची अंदाजित आकडेवारी, स्थिर (2011-12) आणि सध्याच्या किंमती दोन्ही जारी केल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागारांनी आज संध्याकाळी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

डॉ. नागेश्वरन म्हणाले की, एकूणच भारताचे आर्थिक स्थैर्य आणि वाढीचे अंदाज ही अर्थव्यवस्थेची बलस्थाने आहेत आणि पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन आकडेवारीने सरकारच्या एकूण स्थूल-आर्थिक व्यवस्थापनाच्या विशेषत: कोविड महामारीच्या काळात या दोन प्रमुख पैलूंना मजबूत केले आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर भांडवली खर्चात वाढ, विशेषत: ग्रामीण भागातील मोठी मागणी आणि सेवा क्षेत्रातील सुधारित कामगिरी याच्या बळावर भारताच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत सर्वात जलद गतीने वाढ नोंदवली.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वाधिक सकारात्मक असलेली गोष्ट म्हणजे खाजगी क्षेत्राकडून भांडवलाची यथायोग्य निर्मिती सुरू आहे. भविष्यातील रोजगार निर्मिती आणि भारतीय कुटुंबांचा आर्थिक स्रोत वाढण्याच्या दृष्टीने हे सुचिन्ह आहे असे डॉ. नागेश्वरन यांनी स्पष्ट केले. आर्थिक वर्ष 2023- 24 च्या पहिल्या सत्रात खाजगी क्षेत्राने घोषित केलेल्या प्रकल्पांमधील नवीन गुंतवणूक ही गेल्या चौदा वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक आहे असेही त्यांनी पुढे अधोरेखित केले.

दररोजच्या वापरातील ग्राहकोपयोगी वस्तूंची विशेषतः जास्त किमतीच्या मालासाठीची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे, असे डॉक्टर नागेश्वरन यांनी स्पष्ट केले. लहान शहरातही अशीच स्थिती आढळून येत आहे आणि त्यामुळे विकासाला हातभार लागत आहे, असे त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था मंदावल्या असताना सुद्धा सेवा क्षेत्रातील निर्यातींची कामगिरी लक्षणीय आहे. उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र वाढत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मागणीत झालेल्या वाढीमुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येते असेही डॉक्टर नागेश्वरन यांनी नमूद केले. CEA नी सांगितले की बांधकाम साहित्य क्षेत्रामधील वाढीला निवासी बांधकाम क्षेत्रामुळे आधार मिळेल. डॉक्टर नागेश्वरन म्हणाले की केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून भांडवली खर्चातील वृद्धीकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे खाजगी क्षेत्राने या क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे आणि राज्य सरकारांवर सुद्धा त्याचसकारात्मक परिणाम दिसून येतो.

महागाईतील वाढ ही नियंत्रणाखाली आहे आणि आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत असे CEAनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!