प्रतिनिधी,

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाने पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार हे वरीष्ठाचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अमलदार आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की. गायमुख चौक, आंबेगाव या पुणे या ठिकाणी एक इसम कॅमेरे विक्री करीत असून त्याचेकडील कॅमेरे चोरीचे असल्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

बातमीप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यानी गायमुख चौकामध्ये जावुन तेथुन कॅमेरे विक्री करीत असलेल्या बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे ताब्यातील दोन कॅमेरे च हातातील घडयाळाबाबत चौकशी करता त्याने सदरचे कॅमेरे से जानेवारी २०२३ मध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ६०/ २०२३ भादवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा उघडकीस आला असुन सदर बालकाकडुन एकुण ३५०००/- रुपये किंमतीचे दोन महागडे कॅमेरे व एक हातातील घड्याळ हस्तगत करण्यात आले आहे.

सदर मालकाकडे आणखीन चौकशी करता त्याचेकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि

नंबर १०१७/२०२३ नादवि कलम ४५७,४५४,३८० अन्वये गुन्हा उघडकीस आला असून त्याचेकडुन नमुद गुन्हयातील

चोरी गेलेले एकूण ३०,०००/- रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

विधीसंघर्षीत बालकांकडुन एकूण ६५,०००/- रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने व दोन महागडे कॅमेरे व एक

घडयाळ हस्तगत करण्यात आले असून त्याचेकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील गंभीर दोन घरफोडीचे

खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.

१. २. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६०/ २०२३ मोदवि कलम ४५७,३८० भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०७ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७,३८०

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे. श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार अथवतु जमदाडे, अभिनय चौधरी आशिष गायकवाड, सचिन सरपाले शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल ताने विक्रम सावत याच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!