प्रतिनिधी,

अमली पदार्थ विरोधी पथक र कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके व स्टाफ असे अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने विशेष मोहिम राबविणे बाबत आदेश झालेने लोणीकंद पोलीस स्टेशन परीसरात दि.०२/०९/२०२३ रोजी पोलीस अंमलदार योगेश मादरे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जर्मसेल इंडीया कंपनी समोर, पुणे नगर रोड, लोणीकंद, पुणे येथे एक पांढ-या रंगाची एक कार व स्कॉर्पिओ या वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाची पार्टी लावुन आंध्रप्रदेश येथुन मोठया प्रमाणात गांजा हा विक्रीसाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्याने

मिळालेल्या बातमीवरून अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, श्री सुनिल थोपटे पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके व पोलीस अंमलदार हे सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे गाड्याची चेकींग केली असता त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे एक पांढ-या रंगाची एक कार व स्कॉर्पिओ ह्या संशयित वाहनामध्ये इसम नामे १) संदिप बालाजी सोनटक्के, वय २९ वर्षे, रा. मु.पो. दहिवली, अरिहंत आशिया बिल्डींग, पाली फाटा, खोपोली ता. खालापुर, जिल्हा रायगड २) महिला नामे निर्मलाकोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी, वय ३६ वर्षे, रा चिलाकरलुपेठ, जिल्हा गंदर राज्य आंध्रप्रदेश त्यांचे ताब्यातील स्कॉर्पियो गाडी त्यावर लोकसेवक नसताना लोकसेवक असल्याचे भासवण्याकरीता महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावुन व इसम नामे ३) महेश तुळशीराम परीट वय २९ वर्षे, रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापुर, जिल्हा रायगड हा त्याचे कार मधुन तिघानी मिळून एकूण १,१९,८२,२०० /- रु. किं.चा ऐवज त्यामध्ये १,०४,११,०००/- रू. कि. चा ५२० किलो ५५० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, ९,००,०००/- रु. कि.वी. स्कॉर्पिओ गाडी ६.००,०००/- किं.ची कार ७१,०००/- रु कि ये चार मोबाईल फोन व २००/- रू.कि.वा बोर्ड असा ऐवज व अंमली पदार्थ संगनमताने अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पोलीस अमलदार योगेश मांढरे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २०(ब) (ii) (क) २९ व भादंवि कलम १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके, अमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर या करत आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल इझेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक श्रीमती शुभांगी नरके, पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, मनोज साळुके, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन गाळवे, दिनेशः बास्टेवाड तसेच सिंहगड पोलीस स्टेशन कडील पोलीस अमलदार अविनाश कोंडे, तांत्रिक विश्लेषण कडिल पोलीस अंमलदार ऋषिकेश महाल्ले, सलिम तांबोळी, किरण बरडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!