प्रतिनिधी,

मा. वरिष्ठांचे आदेशाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक ०१ कडील स्टाफ पाहिजे / फरारी / तडीपार / मोका / आर्म अॅक्टचे केसेच्या अनुषंगाने सिंहगड रोड व उत्तमनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार, श्रीकांत दगडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन बातमी प्राप्त झाली की मारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २९७/२०२३ भादंवि कलम ३८७,५०६ (२), ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, महा. पोलीस अधि कलम ३७ (१) (३) १३५ मधील पाहिजे आरोपी रोहित पासलकर हा गुन्हा दाखल झालेपासुन फरार असुन तो त्याचे रहाते घरी पानशेत गाव येथे येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदरची बातमी पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीबाबत मा. वरिष्ठांना माहिती देवुन त्यांचे परवानगीने नमुद स्टाफला सदर ठिकाणी जावुन पाहिजे आरोपी मिळुन येताच कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन रोहित शंकर पासलकर, वय-२३ वर्षे, रा. मु.पो. रुळे मोरदरी, ता. वेल्हे, जि. पुणे यास ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक चौकशी करता त्याने व त्याचे इतर साथीदार यांचेसोबत मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून, त्याचा दाखल गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने. त्यास पुढील कारवाईकरीता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे..

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा.सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे ०१ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-०१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, गणेश ढगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!