प्रतिनिधी,

पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन कऱण्यात आले होते. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले होते. वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेते नितेश राणे तसेच आमदार महेश लांडगे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मुस्लिम नागरिकांनी पुणे पोलीसआय़ुक्तांची भेट घेतली.

भाजप नेते नितेश राणे व आमदार महेश लांडगे तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी पुणे महापालिकेसमोर प्रशोभक भाषणे करून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर तात्काळ पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी

मुस्लिम समाजाने पोलीस आयुक्तांकडे केली. तसेच जर गुन्हा दाखल नाही झाला तर पुण्यातील आर. पी.आय. चे रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष मा. राहुल डंबाळे,अल्पसंख्याक. पुणे शहर अध्यक्ष(रि .पा. ई.आठवले)वसीम पहिलवान , पुणे शहर अध्यक्ष.(रि.पा. ई.आठवले)शैलेद्र चव्हाण ,  सौं. स्नेहा माने अध्यक्षा प. मह महिला दलित पँथर वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर.अध्यक्ष मुनवर कुरेशी वंचित बहुजन सामाजिक संघ.अध्यक्ष.सनी निकाळजे.उप अध्यक्ष.वसीम सय्यद.व विविध संघटना व मुस्लिम समाजाकडून शहरात मोठे आंदोलन उभे केलं जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!