प्रतिनिधी,

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अमलदार असे वाहनचोरी प्रतिबंधचे अनुषंगाने खाजगी वाहनाने गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफ मधील पोलीस अंमलदार प्रदीप राठोड व धनंजय ताजणे यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा पारगे चौक मंगळवार पेठ जवळील आशिवाद बिल्डींगचे समोर रोडवर बाहेर पुणे येथे उमा असुन त्याचेजवळ असलेल्या बजाज पल्सर १५० मोटार सायकल काळया रंगाची व लाल पटयाची मोटारसायकल ही चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. सदरची बातमी ही वपोनि अशोक इदलकर यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खातरजमा करुन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

प्राप्त बातमीचे अनुषंगाने इकडील अधिकारी व अमलदार असे वरील ठिकाणी जावून पाहणी केली असता बातमीतील वर नमुद वर्णनाचा एक इसम मोटार सायकलसह मिळून आल्याने त्यास जागीच ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन सिध्दाराम चौगुले वय २३ वर्षे रा. ओम ब्लड़ बँक हनुमान मंदीर मंगळवार पेठ पुणे व मुळ गाव संगमेश्वर गल्ली मैंदर्गी सोलापुर असे असल्याचे सांगीतले. सदर मोटार सायकलबाबत त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदरची मोटार सायकल ही साधारण ४ दिवसापुर्वी लेन नं १५, प्रभात रोड, शौनक बिल्डींगचे समोरील रोडवरुन चोरली आसल्याचे सांगीतले. त्याचेकडुन डेक्कन पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं १५३/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असुन त्याचेकडुन किं रु १,००,०००/- ची एक बजाज कंपनीची १५० पल्सर मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच पुढील कारवाईकरीता डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १. गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक इंदलकर, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे व आजीनाथ येडे व नारायण बनकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!