प्रतिनिधी,

यातील फिर्यादी हे एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपीताने फिर्यादी यांना मोबाईल क्रमांक ९३९५१६९७७१, ६००३६२७७२ वरून ऑफिसचा मो. क्र. ९१५८००२९४७ वर मेसेजेस व संपर्क करून नामांकित व्यक्ती इन्फिनिटी डेवलपर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीचे संचालक बोलत आहेत असे भासवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून लबाडीचे इरादयाने फिर्यादी यांच्या कंपनीच्या अकाऊंट मधुन आरोपीतांनी १ ) JAMALUDDIN SHAIKH A/c No. 50100307953492HDFC 0000455 यामध्ये ९,८०, ५०६/- रु. २) BABAI DA 501005HDFC 000171 यामध्ये ३५,९०,६०८/-रु. ३)TANKESWAR BORA 50200078 HDFC0009250 गामध्ये २०,७०,४०८/-रु. असे ऑनलाइन पद्धतीने एकुण ६६,४१,५२२/- रु पाठवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणुक केली म्हणुन फिर्यादी यांनी दि. १८/०५/२०२३ रोजी फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु. रजि. नं. ६०/२०२३.भा.द.वि. कलम ४१९.४२०३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६सी.६६डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपीतानी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्याचा तांत्रिक तपास करून आरोपीतांचा ठावठिकाणा हा इजगाली, जि. सिवान, राज्यविहार येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सिवान बिहार येथे सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलीस पथक पाठवून सदर गुन्हयातील फिर्यादी यांना संपर्क साधून फसवणूक करणा-या टोळीतील एक आरोपी नामे विशाल कुमार भरत मांझी, वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, लकरी दरगाह, सिटी सिवान, राज्य बिहार यास दि. ०३/०९/२०२३ रोजी अटक करून त्यास मा. अपर मुख्य न्यायालय तृतीय, सिवान, बिहार यांचे ट्रान्झीट रिमांड घेवून त्यास सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे घेऊन आलो, त्यास आज रोजी मा न्यायालयासमोर हजर केले असता अटक आरोपीस दि. ११/०९/२०३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून ३०००/- रुपये किंमतीचा एक रेडमी कंपनीचा रेडमी-०९ व वेगवेगळ्या कंपनीचे एकूण ०६ सिमकार्ड हस्तगत

करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत हे करीत आहेत. सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे की, वर नमुद बैंक अकाऊंट नंबर व मोबाईल नंबर यांचा वापर करून कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेशी संपर्क करावा.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री आर. एन. राजे यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. मिनल सुपे पाटील, पो.नि. चंद्रशेखर सावत पोउपनि प्रमोद खरात पोलीस अमलदार वैभव माने अश्विन कुमकर शिरीष गावडे, प्रविण राजपुत राजेश केदारी, दत्तात्रय फुलसुंदर सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांनी केला असून तपासामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!