प्रतिनिधी,

हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दिक्षित यांनी आज बंगळूर येथे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) हे मुलभूत प्रशिक्षणासाठी वापरण्यात येवू शकणारे विमान स्वतः चालवून बघितले.

एचटीटी-40 हे पूर्णपणे एयरोबॅटिक प्रकारचे विमान असून, ते चार पात्यांच्या टर्बो-प्रॉप इंजिनाच्या शक्तीने सुसज्जित आहे. या विमानामध्ये अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे काचेचे कॉकपिट, आधुनिक हवाई यंत्रणा तसेच झिरो-झिरो इजेक्शन सीटसह अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविलेल्या आहेत. या प्रशिक्षण विमानाला 450 किमी प्रतितास इतका कमाल वेग गाठता येत असून जास्तीतजास्त सहा किलोमीटरचे सेवा सिलिंग आहे.

दिनांक 31 मे 2016 रोजी एचटीटी-40 या विमानाचे पहिले उड्डाण झाले आणि 06 जून 2022 रोजी या विमानाने यंत्रणा पातळीचे प्रमाणपत्र प्राप्त केले.लष्कराच्या हवाई उपयोगासाठी बाबतच्या केंद्राकडून या विमानाला उड्डाणासाठी परवानगी आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भारतीय हवाई दलाने एचएएल कंपनीसोबत अशा 70 विमानांच्या पुरवठ्यासाठी करार केला असून, 15 सप्टेंबर 2025 ते 15 मार्च 2030 या कालावधीत हा पुरवठा होणे अपेक्षित आहे. एचटीटी-40 हे विमान भारतीय हवाई दलातील वैमानिकांच्या सुरुवातीच्या काळातील प्रशिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवून आणेल. या खरेदी करारामध्ये विमानाच्या हवाई प्रशिक्षणाला पूरक ठरणाऱ्या फुल मिशन सिम्युलेटर प्रणालीचा देखील समावेश आहे. या प्रणालीमुळे वैमानिकांना या विमानाची प्रत्यक्ष हवाई फेरी सुरु करण्यापूर्वी, जमिनीवर विविध पद्धतीच्या उड्डाणांचा सराव करता येईल.

एचटीटी-40 या विमानाचे विकसन म्हणजे केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला अनुसरत, संरक्षण तसेच हवाई क्षेत्रांमध्ये अधिक स्वावलंबन प्राप्त करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!