प्रतिनिधी,

लिंग समानता आणि सर्व महिला तसेच मुलींचे सक्षमीकरण’ या विषयात सर्वोत्तमता मिळवण्याप्रती भारताच्या सामुहिक आणि अविचल निष्ठेला आता नवी दिल्ली येथील जी-20 प्रमुखांचा जाहीरनामा 2023 मध्ये अढळ स्थान मिळाले आहे.

लिंग समानता, महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या संदर्भात ऐतिहासिक कामगिरी करत, नवी दिल्ली येथील जी-20 प्रमुखांचा जाहीरनामा 2023 मध्ये, गांधीनगर येथे 2 ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत झालेल्या महिला सक्षमीकरणविषयक मंत्रीस्तरीय परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या अध्यक्षांच्या निवेदनाचा समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील जी-20 प्रमुखांचा जाहीरनामा 2023 ‘आर्थिक तसेच सामाजिक सक्षमीकरण’, ‘लिंगविषयक डिजिटल विभागणी कमी करणे, ‘लिंग समावेशक हवामानविषयक कृतीला चालना’ आणि ‘महिलांची अन्नसुरक्षा, पोषण आणि स्वास्थ्य यांचे संरक्षण’ या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, महिलांच्या सक्षमीकरणाबाबत कृतिगटाची निर्मिती करण्याला जी-20 समूहाच्या नेत्यांनी मान्यता दिली. ब्राझीलच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात या गटाची पहिली बैठक होणार आहे.

‘लिंग समानता आणि सर्व महिला तसेच मुलींचे सक्षमीकरण’ या विषयात सर्वोत्तम ठरण्याप्रती भारताच्या सामुहिक आणि अविचल निष्ठेला आता नवी दिल्ली येथील जी-20 प्रमुखांचा जाहीरनामा 2023 मध्ये अढळ स्थान मिळाले आहे.

महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताची जी-20 अध्यक्षता जगभरात महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीची अग्रदूत झाली आहे. भारताने अध्यक्षतेच्या काळात लिंग समानतेच्या मुद्द्यावर आधारित सहा आंतरराष्ट्रीय परिषदा आणि 86 आभासी पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन केले होते. यामध्ये अपोलो रुग्णालय समूहाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संगीता रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-20 ईएमपीओडब्ल्यूईआर बैठकीचा तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त नृत्यशिक्षिका डॉ.संध्या पुरेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डब्ल्यू 20 बैठकीचा समावेश आहे.

या काळात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी वॉकेथॉन आणि फ्लॅश मॉबसह लोकसहभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने त्यांची प्रशंसा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!