प्रतिनिधी,

एएसआर गॅरेजचे बाजूची गल्ली, गुलाम अलीनगर, गल्ली नं. ३, हडपसर, पुणे येथे इसम नामे सादिक करीम रा. गुलामअली नगर, हडपसर पुणे व त्यांचा मुलगा नामे अनिस यानी दिनाक १६/०८/२०२३ रोजी रात्रौ १०/३० वा. झालेल्या भांडणाबाबत चर्चा करण्याचा बहाणा करून फिर्यादी व त्यांचे दोन मुले तसेच सोबत असलेले तीन इसम यांना बोलावन घेवुन चर्चा चालु असताना वर नमुद इसम नामे १) सादीक अब्दुल करीम शेख २) अनिस सादीक शेख ३) शाकीर कादर सैय्यद ४) जाकीर कादर सय्यद ५) अमीर खान ६) मोहसीन जावेद शेख ७) सिंकदर ८) शहाबाज कादीर शेख व त्यांचे सोबत असलेले दोन इसम यांनी त्याचेकडील लोखंडी तलवारी, धारदार शस्त्राने तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने फिर्यादी यांचा मुलगा अजीम शेख यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून, त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे. तसेच फिर्यादी व त्यांचा लहान मुलगा व त्यांचे समवेत असलेल्या इसमाना वार करून गंभीर जखमी करुन तसेच शिवीगाळ करून सदर ठिकाणी जमलेल्या लोकांकडे बघुन त्याचे हातातील हत्यारे हवेत फिरवुन जमलेल्या लोकाचे मनात दहशत निर्माण केली म्हणुन सदरबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४०५/२०२३. भा. दं.वि. कलम ३०२, ३०७,३२३ ५०४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १२० (ब), क्रिमीनल अॅमेन्डमेंट अॅक्ट कलम ७ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) आदनान आबीद शेख, वय-२५ वर्षे.रा.ग.नं.२१.ए.सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) २) सादीक अब्दुल करीम शेख, वय-५६ वर्ष, रा. गल्ली नं.०५. गुलामअलीनगर, हडपसर, पुणे ३) अनिस सादीक शेख, वय-३२ वर्ष रा. गल्ली नं.०५ गुलामअलीनगर, हडपसर, पुणे ४) शाकीर कादर सैय्यद, वय-३० वर्ष, रा. गल्ली नं. १९, सैय्यद नगर, हडपसर पुणे ५) मोहसीन जावेद शेख, वय २४ वर्षे, रा. तास्मीयों मंजील सैय्यदनगर, हडपसर, पुणे ६) शहाबाज कादीर शेख, वय-२८ वर्षे, रा. गल्ली नं. १९, सैय्यदनगर, हडपसर, पुणे ( अटक) ७) जाकीर कादर सैय्यद, वय ४५ वर्ष, रा. गल्ली नं. १९. ए. सैय्यदनगर, हडपसर, पुणे ८) अमीर अकिल सैय्यद, वय-२० वर्ष, रा. गल्ली नं. १९, ए, सैय्यदनगर, हडपसर, पुणे ९) सिंकदर आयुब शेख वय ३५ वर्ष रा. गल्ली नं.२३. ए. सैय्यद नगर, हडपसर, पुणे १०) अकबर अफजल हुसेन शेख, वय- ४३ वर्षे, रा. ग.नं. २६, सैय्यदनगर, हडपसर, पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने अ.नं.०१ ते ०६ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन, (आ.क्र.०७ ते १० टोळी सदस्य हे पाहिजे आरोपी आहेत.)

नमुद आरोपी १) आदनान आबीद शेख, वय २५ वर्षे, रा. ग.नं.२१. ए. सैय्यदनगर, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) याने संघटित टोळी तयार केली असुन टोळीचे सदर परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत.

नमुद आरोपी विरुध्द दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ ये कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे अंतर्भाव करण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. भाऊसाहेब पटारे यांनी मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडल-०५, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणी छाननी करून वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४०५/२०२३.मा.दं.वि. कलम. ३०२,३०७, ३२३, ५०४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १२० (ब) क्रिमीनल अँगेन्डमेंट अॅक्ट कलम ७. भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ या प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ ये कलम ३ (१) (ii)३ (२), ३(४) या कलमाथा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, श्री शाहुराजे साळवे हे करीत आहेत..

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलिस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. रंजन कुमार शर्मा, मा.पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ – ०५. पुणे श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री. शाहुराजे साळवे त्याचे मार्गर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री विनय पाटणकर, पोलीस उप-निरीक्षक, संतोष सोनवणे, श्रेणी पोलीस उप- निरीक्षक, ज्ञानदेव शेलार, पोलीस अंमलदार अमोल घावटे, उत्तेश्वर धस, पुनम राणे, हनुमंत कांबळ, दिनेश जाधव यांनी कारवाई केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिका मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ५९ वी कारवाई आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!