प्रतिनिधी,

 

इफा पान शॉप, रॉयल सोसायटी, हांडेवाडी रोड, पुणे येथे फिर्यादी है त्यांचे पानटपरीवर असताना आरोपी अमर देशमाने गणेश कोरडे, साहिल कचरावत यांनी फिर्यादी यांचेकडे पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यांना नकार दिला असता त्यांनी त्याच्याकडील लोखंडी हत्याराची मिती दाखून त्यांना हाताने मारहाण करून पानटपरीचे गल्ल्यातील अंदाजे १५००/- रु रोख रक्कम बळजबरी काढून घेवुन पळुन जावु लागले. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडा-ओरडा केला असता आरोपी पळून जात असताना जमलेल्या लोकांनी त्यातील ५) अमर विठ्ठल देशमाने २) गणेश गौतम कोरडे यांना पकडले. त्यानंतर त्यांचा एक साथीदार तेथुन पळुन गेला. त्यादरम्यान अमर विठ्ठल देशमाने याने त्याचे कडील लोखंडी हत्यार हवेमध्ये फिरवून आम्ही येथील भाई आहोत असे म्हणून दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यानी दिले फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं.८०२/ २०२३ भादंवि कलम ३८६ ५०४, ५०६ (२) आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ महा.पो.अधि. कलम १४२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) गणेश गौतम कोरडे, वय २२ वर्षे, रा. कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, शितोळे वस्ती मार्ग, हडपसर पुणे (टोळी प्रमुख) २) अमर विठ्ठल देशमाने, वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०४ शेवाळे कॉम्प्लेक्स, मयुर पार्क हांडेवाडी चौक, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. ३) साहिल अर्जुन कचरावत वय २१ वर्षे रा.स.नं.६८.कंजारभाट वस्ती सुर्यमुखी मंदिर पुणे (टोळी सदस्य) हा पाहिजे आरोपी आहे.

नमुद आरोपी टोळी प्रमुखः १) गणेश गौतम कोरडे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारांसह यांचे सह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असून, सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपण स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे दंगा करणे, मालमतेचे नुकसान करणे पोलीसांचे आदेशाचा भंग करणे नागरीकांना मारहाण करुन जखमी करणे शिवीगाळ करून व हत्यारांचा धाक दाखवून नागरिकामध्ये दहशत पसरवणे, दरोडा घालणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्याचेवर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे दाखल असून, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम कलम ३(१)(ii). ३(२), ३(४) प्रमाणे अंतर्भाव करण्यासाठी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे श्री. संतोष सोनवणे यांनी मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५, पुणे श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता..

सदर प्रकरणी छाननी करून काढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि नं.८०२ / २०२३ भादंवि कलम ३८६.५०४, ५०६ (२) आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ महा. पो. अधि.कलम १४२ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१)(ii). ३ (२) ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे,

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री.शाहुराजे साळवे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग विभाग श्री शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे श्री. संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक. (गुन्हे) श्री संदीप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संजय मोगले, पोलीस उप-निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस अंमलदार, जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यानी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ६० वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!