प्रतिनिधी,

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने युनिट-०४ कडील पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की साईबाबा मंदीर, जुना पुणे-मुंबई हायवे रोडवर बोपोडी मेट्रो स्टेशन जवळ तीन इसम चोरी केलेले मोबाईल कमी किंमतीत विकत आहेत.

सदर बातमीचे अनुशंगाने पथकाने दातमीच्या ठिकाणी जावून त्यांना पकडले असता त्यांचेकडे एक स्कुटर मिळून आली. सदर स्कुटरची झडती घेता, त्याचे डिकी मध्ये वेग-वेगळ्या कंपनीचे एकूण १२ मोबाईल फोन व ०१ चाकू मिळून आला. त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारता त्यांनी त्याची नावे १) किशोर उत्तम गायकवाड़ २) अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर ३) आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदरबाबत चौकशी करता, त्यांनी सदरचे मोबाईल पुणे व पिंपरी-चिंचवड भागात तसेच

पुणे-बंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी एकटे जाणान्या लोकांना चाकुचा धाक दाखवून त्यांचकडून जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करता, त्यांनी त्याचे आणखी दोन साथीदार हे हॅरिस ब्रिज जवळ बोपोडी येथे थांबलेले असून त्याचेकडे देखील काही चोरीचे मोबाईल फोन आहेत असे सांगितलेने सदर आरोपींना त्याचेकडील मिळालेल्या मोबाईल फोन व स्कुटरसह हरिस ब्रिजजवळ बोपोडी येथे गेले असता तेथे त्यांचे दोन साथीदार नामे ४) जॉर्ज डॉनिक डिसोजा ५) साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख असे असल्याचे

सांगितले. त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात वेग-वेगळ्या कंपनीचे ०८ मोबाईल फोन मिळुन आले. तसेच

त्यांचे ताब्यात एक मोटार सायकल मिळुन आली. सदर दोन्ही वाहनाचा उपयोग ते रात्री एकटे जाणा-या

लोकांना अडवून त्यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन चोया करण्यासाठी करत असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेले आरोपी १ ) किशोर उत्तम गायकवाड, वय- १९ वर्षे, रा. स.नं. २४. कमलाबाई बहीरट चाळ, बोपोडी, पुणे २) अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर, वय २१ वर्षे रा. स.नं.२४, बोपोडी पुणे ३) आधिश ऊर्फ वोना संतोष सोजवळ, वय-२४ वर्षे, रा. स.नं. २४. सावंत नगरीजवळ, बोपोडी पुणे ४) जॉर्ज डॉम्निक डिसोजा, वय- १९ वर्षे, रा. स.नं.२४, सम्राट अशोक नगर, पवळे चाळ, बोपोडी, पुणे ५) साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख, वय- १९ वर्षे, रा. इंदीरानगर वसाहत, घर नं. २, खडकी बाजार, खडकी, पुणे यांचेकडून एकूण २० मोबाईल फोन, ०१ धारदार चाकु तसेच गुन्हयात वापरलेली 09 अॅक्टिव्हा स्कुटर 09 बजाज पल्सर गाडी असा एकूण रु. ४,१५,२००/- किचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिल नमुद आरोपींकडून आतापर्यंत खालीलप्रमाणे जबरी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे.

१) खडकी पोलीस ठाणे गुरनं. ३३८/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ५०६, ३४

२) खडकी पोलीस ठाणे गुरनं. ३३५ / २०२३ ना.द.वि.कलम ३९२, ३४ ३) खडकी पोलीस ठाणे गुरनं ३३६ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४

४) सांगवी पोलीस ठाणे गुरन.४८६/२०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४

५) सांगवी पोलीस ठाणे गुरनं. ४८८/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ ६) चतुःशृंगी पोलीस ठाणे गुरनं. ६०६/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४

७)

चतुःशृंगी पोलीस ठाणे गुरनं.६३७/२०२३ भा.द.वि. कलम ४५७३८०, ३४

<) चतु श्रृंगी पोलीस ठाणे गुरनं. ६३८ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४

९)

स्वारगेटपोलीस ठाणे गुरनं. २३८/२०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४

१०) ११) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुरनं ४३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १०६४ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ १२) भारती विद्यापिठ पोलीस ठाणे गुरनं ५७९ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४

१३)

वरिल आरोपांकडून एकुण ११ मोबाइल जबरी चोरीचे व ०१ घरफोडी असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक, जयदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक महेंद्र पवार, पोलीस अंगलदार अजय गायकवाड, हरीष मोरे, प्रविण भालचिंग, विठ्ठल वाव्हळ, संजय आचारी, पोलीस नाईक सारस साळवी नागेशसिंग कुँवर, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, अशोक शेलार, अमोल वाडकर, रमेश राठोड, महीला पोलीस अंमलदार, वैशाली माकडी, चालक सहा. पो. फौज शितल शिंदे यांनी केली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!