प्रतिनिधी,

फिर्यादा श्रीमती रोहमा सालीम अलवादी वय ४७ वर्ष हे टांझानिया देशातील नागरिक असून ते त्यांचे पतीचे कामानिमित्त कुटुंबासह मुंबई आले असता, दिनांक ०१.०६.२०२३ रोजी २१:०० वा ते २१:१० चे सुमारास हॉटल ताज पॅलेसचे मागील रोड, कुलाबा, मुंबई येथे एका अनोळखी इसमाने त्यांचे गळ्यातील काळ्या रंगाची पसं हिसकावून मोटार सायकलवर बसून पळून गेले होते. फिर्यादी यांनी घटनेबाबत कुलाबा पोलीस ठाणेस रिपोर्ट केल्यावरून गु.र.क्र. १४१/२०२३, कलम ३९२, ३४. भा. दं. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान घटनास्थळाचे फुटेज व मिळालेल्या गुप्त बातमी वरून १) मोह. अरफात वहिन चौधरी वय २६ वर्ष, २) सैफ रज्जाक खान वय २१ वर्ष व ३) फहीम, अयाज शेख वय २६ वर्ष या तीन आरोपिताना अटक करून त्यांचेकडून एकूण २,३७,६००/- रु. व २२०० अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनातील किमती १,९५,८००/- रु.) व आय फोन १४ प्री मोबाईल किमती ७०,०००/- रु. असा एकूण ५,०३,४०० रु. चा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

फिर्यादी हे परदेशी नागरिक असल्याने त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळणेकरिता कुलाबा पोलीस ठाणेकडून मा. न्यायालयात सतत पाठपुरावा करून मा. न्यायालयाचे आदेशाने एकूण ५,०३,४००/- रु. किमतीचा मुद्देमाल मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मुंबई शहर यांचे हस्ते फिर्यादी महिला श्रीमती रहिमा सालीम अलवाद यांना दिनांक १३/०९/२०२३ रोजी परत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई, डॉ. प्रविण मुंढे,, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मुंबई, श्री. शशिकिरण काशिद, सहा. पोलीस आयुक्त, कुलाबा विभाग व विजय हात्तिमकर, वपोनि, कुलाबा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक स्वप्निल वाघ, पो. ह. मोहिते, पोशि भोसले, पोशि अत्रे, पोशि पुरे या पथकाने केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!