प्रतिनिधी,

खंडणी विरोधी पथक ०२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार, शंकर संपते यांना दि. १४/०९/२०२३ रोजी माहिती मिळाली की कुख्यात गुंड गुन्हेगार बाबुलाल लक्ष्मण मोहोळ व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांची आई व त्यांच्या सहकारी महिला या दोघींचे दिनांक १३/०९/२०२३ रोजी सायकाळी अपहरण करून डांबून ठेवून मारहाण करीत आहे व त्यांचे सुटकेसाठी १७ लाख रुपयांची मागणी करीत आहेत.

सदरची माहिती मिळताच पोलीस उप-आयुक्त, गुन्हे व सहा.पो आयुक्त गुन्हे ०२ यांनी खंडणी विरोधी पथक ०२ चे अधिकारों व अंमलदार याना सदरवा अपहरण करणारा आरोपी व त्याचे साथीदार हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने तात्काळ टिम तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथक – ०२ चे पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोउनि श्रीकांत चव्हाण व अंमलदार यांनी जलद गतीने पथक तयार करून, सदर अपहृत महिला व आरोपी यांची ठिकाण्याबाबतची माहिती मिळवून आरोपींवर कारवाई करुन उत्तमनगर पुणे येथून सराईत गुन्हेगार १) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ, वय ४५ वर्षेरा सरडेबाग, पार्वती अपार्टमेंट समोर, उत्तमनगर, पुणे २) अमर नंदकुमार मोहिते, वय ३९ वर्षे रा. गणेशनगर, एरंडवणा, ओटा वसाहत, पुणे ३) प्रदिप प्रभाकर नलवडे, वय ३८ वर्षे, राजगुरु अपार्टमेंट, भुगाव, पुणे ४) अक्षय मारुती फड वय २४ वर्षे, रा. अमर भारत सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे यांना जेरबंद करून त्यांचे ताव्यातील नमूद अपहृत महिलांची सुखरुप सुटका केली…

सदर अपहृत महिला यांचेकडे चौकशी करता आरोपींनी नमूद महिलांना दि. १३/०९/२०२३ रोजी सायंकाळी ७/०० वा. रुद्र हॉटेल उत्तमनगर पुणे येथे बोलावून पुणे स्टेशन येथील स्टॉल मिळवून दिले नाहित म्हणुन ६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे असे म्हणून दमदाटी करून मारहाण करुन तेथून अपहरण करुन उत्तमनगर येथील एका खोलीमध्ये डांबून ठेवून रात्रभर शिवीगाळ व मारहाण करून नमूद महिलेचा मुलगा (फिर्यादी) यास फोनवरुन त्यांच्या सुटकेसाठी १७ लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे निष्पण्ण झाले.

सदर आरोपी यांचेवर उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९६/२०२३.भा.दं.वि. कलम ३८५,३८७,

३६४ (अ).३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करून नमूद चार आरोपींना पुढील कार्यवाहीकामी

उत्तमनगर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी बाबुलाल लक्ष्मण मोहोळ याचेवर

यापूर्वी जीव घेण्याचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, दंगल, अग्निशस्त्रे बाळगणे असे १० गुन्हे व इतर आरोपींवर

सुध्दा शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, गा सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. सतिश गोवेकर याचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – ०२ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वहाण, मोहनदास जाधव व पोलीस अमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शंकर संपते, सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, इश्वर आधळे, राहुल उत्तरकर, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!